आयपीएलआधी गुजरात टायटन्समध्ये मोठा बदल; स्टार वेगवान गोलंदाजाचा संघात प्रवेश

मिनी ऑक्शननंतर आता गुजरात टायटन्सचा संघ बदलला आहे. वेगवान गोलंदाज पृथ्वीराज यारा दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे. अशा परिस्थितीत, फ्रँचायझीने त्याचा बदली खेळाडू (Replacement) शोधून काढला आहे. कर्णधार शुभमन गिल आणि मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा यांनी संघाच्या जुन्या खेळाडूवर पुन्हा एकदा विश्वास दर्शवला आहे. या खेळाडूने आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सपूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्ससाठी देखील खेळले आहे. घरगुती क्रिकेटमध्येही या वेगवान गोलंदाजाची कामगिरी उत्तम राहिली आहे.
वेगवान गोलंदाज पृथ्वीराज यारा दुखापतीमुळे आयपीएल २०२६ मधून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी आता आयपीएल २०२६ मध्ये कुलवंत खेजरोलियाला गुजरात टायटन्सच्या संघात स्थान मिळाले आहे. कुलवंत यापूर्वीही आशिष नेहरांच्या मार्गदर्शनाखाली गुजरात संघाचा भाग राहिला आहे. याच कारणामुळे कर्णधार शुभमन गिल आणि मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा यांनी त्याच्यावर पुन्हा एकदा भरवसा टाकला आहे. संघात झालेल्या या बदलाची अधिकृत घोषणा खुद्द आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने सोशल मीडियावर केली आहे. विशेष म्हणजे कुलवंत खेजरोलिया केवळ ३० लाख रुपयांत गुजरात संघाचा भाग बनला आहे. कुलवंतने आतापर्यंत आयपीएलमध्ये ६ बळी (Wickets) आपल्या नावावर केले आहेत.
Comments are closed.