व्होडाफोन-आयडियाचा हिस्सेदार व्हायला दिग्गज कंपन्या इच्छुक

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

दोन मोठय़ा कंपन्या व्होडाफोन आयडियामधील भागीदारी खरेदी करण्यास इच्छुक आहेत. सिंगापूरची कंपनी एसटी टेलिमीडिया आणि जेएसडब्ल्यू ग्रुप या कंपन्या टेलिकॉम कंपनीचा काही हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत आहेत. केंद्र सरकारकडे सध्या व्होडाफोन आयडियाचा सर्वाधिक हिस्सा आहे.

केंद्र सरकारकडून मिळालेल्या आर्थिक दिलाशानंतर गुंतवणूकदारांचा व्होडाफोन आयडियामधील रस वाढला आहे. व्होडाफोन आयडीया कंपनीची 16 आणि 17 मार्च रोजी सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये संस्थात्मक गुंतवणूकदारांसोबत बैठक होणार असल्याचे समजते. सध्या व्होडाफोन आयडियामध्ये सरकारची एकूण 49 टक्के भागीदारी आहे. आदित्य बिर्ला ग्रुप आणि ब्रिटनचा व्होडाफोन ग्रुप पीएलसी हे याचे प्रवर्तक आहेत. या कंपनीत आदित्य बिर्ला ग्रुपकडे 9.50 टक्के, तर व्होडाफोन ग्रुपकडे 16.07 टक्के हिस्सा आहे. अमेरिकन कंपनीदेखील शर्यतीत अमेरिकेची टिलमॅन ग्लोबल होल्डिंग्स ही कंपनीदेखील शर्यतीत आहे.

Comments are closed.