रिव्होल्युशनरी गार्डचे गुप्तचरप्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
देशाच्या संरक्षणासाठी प्राणपणाने लढणाऱ्या इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सला (आयआरजीसी) आज जबर धक्का बसला. अमेरिका व इस्रायलच्या हल्ल्यात रिव्होल्युशनरी गार्डच्या गुप्तचर विभागाचे प्रमुख मेजर जनरल माजिद खादेमी यांचा मृत्यू झाला. आयआरजीसीने स्वतः यास दुजोरा दिला. मागील वर्षी झालेल्या इराण-इस्रायल युद्धात मोहम्मद काझेमी यांचा मृत्यू झाल्यानंतर खादेमी यांनी गुप्तचर विभागाच्या प्रमुखपदाची सूत्रे हाती घेतली होती. उच्चविद्याविभूषित असलेले खादेमी हे इराणी लष्करातील एक शक्तिशाली अधिकारी होते.
Comments are closed.