कागदपत्रे जमा करण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ, अपात्र गिरणी कामगारांना दिलासा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबईच्या वैभवशाली इतिहासाचे साक्षीदार असलेल्या गिरणी कामगारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. घर मिळवण्याच्या प्रक्रियेत तांत्रिक कारणांमुळे किंवा कागदपत्रांच्या त्रुटींमुळे ज्या कामगारांना ‘अपात्र’ ठरवण्यात आले होते, त्यांना आता आपली पात्रता सिद्ध करण्यासाठी येत्या 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

पात्रता निश्चितीच्या प्रक्रियेत अनेक मूळ कामगार आणि त्यांच्या वारसांना किरकोळ त्रुटींमुळे अपात्र घोषित करण्यात आले होते. या अन्यायाविरुद्ध गिरणी कामगार तरुण स्वराज्य संघटनेने कामगार विभाग आणि संबंधित प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून अपील करण्याची संधी देण्याची मागणी केली होती. प्रशासनाने याची दखल घेत आता कागदपत्रे पुन्हा अपलोड करण्यासाठी आणि अपील करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली आहे.

Comments are closed.