IPL 2026: रवींद्र जडेजा आपल्या नवीन संघात दाखल! फ्रँचायझीने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत केलं जंगी स्वागत

टी-20 वर्ल्ड कप 2026 (Icc T20 international world cup 2026) संपल्यानंतर आता क्रिकेट चाहत्यांचे लक्ष आयपीएल 2026 (IPL 2026) स्पर्धेकडे लागले आहे. या स्पर्धेची सुरुवात 28 मार्चपासून होणार आहे. यासाठी सर्व 10 फ्रेंचायझींनी आपापली तयारी सुरू केली आहे. या आयपीएल हंगामात राजस्थान रॉयल्सचा संघ बराच बदललेला दिसेल.

आयपीएल 2026 मध्ये राजस्थानसाठी (sanju samson not a part of Rajasthan royals) यावेळी संजू सॅमसन खेळताना दिसणार नाही. त्याच्या जागी संघात एका भारतीय स्टार ऑलराउंडरची एन्ट्री झाली आहे. तो खेळाडू दुसरा कोणी नसून रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आहे. रवींद्र जडेजा आयपीएल 2026 पूर्वी आपली नवीन फ्रेंचायझी राजस्थान रॉयल्समध्ये सामील झाला आहे.

याची माहिती फ्रेंचायझीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून दिली आहे. राजस्थानच्या कॅम्पमध्ये सामील झाल्यानंतर आता जडेजा आगामी हंगामाची तयारी करेल. फ्रेंचायझीने शेअर केलेला हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडत आहे. विशेष म्हणजे जडेजा यापूर्वीही राजस्थानसाठी खेळला आहे. तो 2008 मध्ये राजस्थानचा भाग होता, जेव्हा RR च्या संघाने पहिल्या हंगामात विजेतेपद पटकावले होते.

आयपीएल 2026 पूर्वी चेन्नई सुपर किंग्स (CSK and RR) आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात एक मोठी डील झाली होती. या ट्रेड डीलअंतर्गत सीएसकेने आपले दोन स्टार खेळाडू रवींद्र जडेजा आणि सॅम करन यांना राजस्थान रॉयल्सकडे पाठवले आहे. आता जडेजा 14 कोटींच्या मोठ्या रकमेसह पुढील हंगामात राजस्थान रॉयल्ससाठी खेळताना दिसेल. तर दुसरीकडे, राजस्थानने आपला कर्णधार संजू सॅमसनला सीएसकेमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. संजू 18 कोटींच्या रकमेसह सीएसकेशी जोडला गेला आहे.

जडेजा 2012 पासून सीएसके संघाचा भाग होता आणि त्याने या फ्रेंचायझीसोबत तीन आयपीएल विजेतेपदे जिंकली आहेत. त्याने आतापर्यंत 254 आयपीएल सामने खेळले आहेत. या काळात त्याने फलंदाजीमध्ये 198 डावांत 27.86 च्या सरासरीने 3260 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 5 अर्धशतके झळकावली आहेत. तसेच त्याने गोलंदाजीत 170 विकेट्स घेतल्या आहेत आणि एकदा पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. आयपीएलमध्ये जडेजाचा इकॉनमी रेट 7.67 चा राहिला आहे.

Comments are closed.