मध्य प्रदेशात मोठ्या ट्रेनचा अपघात थांबला
खंडवा:
मध्यप्रदेशच्या खंडवा जिल्ह्यात रेल्वे कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे एक मोठी रेल्वे दुर्घटना टळली आहे. बरुड छनेरा येथे रेल्वेमार्ग दोन हिस्स्यांमध्ये तुटला होता. कीमॅनने रेल्वेमार्गाला तडा गेल्याचे पाहून येणारी रेल्वेगाडी रोखण्याचा संदेश दिला होता. यानंतर या रेल्वेमार्गावरुन जाणारी हॉलिडे स्पेशल रेल्वे रोखण्यात आली होती. ही रेल्वे इटारसी येथून भुसावळच्या दिशेने जाणार होती. रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत रेल्वेमार्ग दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.
Comments are closed.