मी माझा पक्ष वाढवतोय, दोन तीन हजारांनी निवडून आलो नाही, मकरंद पाटलांचा गोरेंना टोला

Makarand Patil : सातारा जिल्ह्यात महायुतीत ठिणगी पडली आहे. मंत्री जयकुमार गोरे आणि मंत्री मकरंद पाटील हे दोन्ही नेते एकमेकांच्या मतदार संघात राजकीय कार्यक्रम घेत आहेत. एका कार्यक्रमादरम्यान मंत्री मकरंद पाटील यांचे नाव न घेता जयकुमार गोरेंनी टीका केली होती. त्यांच्या टीकेला आता मंत्री मकरंद पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. कोण नेमकं काय म्हणाले यााबाबतची माहिती पाहुयात.

कोण काय म्हणाले?

कोणीही बाभळीच्या झाडाखाली उभे राहत नाही, त्याला आंब्याची सावली लागते. बावधन गावची ताकद राजकारण बदलवण्याची आहे, आजची सभा परिवर्तनाची आहे असे ते म्हणाले होते. त्यांच्या या टीकेला मकरंद पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. जयकुमार गोरे हे त्यांचा पक्ष वाढवतात, मी माझा पक्ष वाढवतोय. वाई मतदारसंघात मला कायमच वाढीव मतदान मिळाल्याचे पाटील म्हणाले. मी दोन तीन हजाराने निवडून आलो नाही, असे म्हणत मकरंद पाटील यांनी जकुमार गोरेंना टोला लगावला. मंत्री मकरंद पाटील यांच्याकडूनही उद्या माण विधानसभा मतदारसंघात अजित दादांच्या उपस्थित राजकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे.

सातारा जिल्ह्यात सध्या महायुतीमध्ये खटका उडाल्याचं चित्र

सातारा जिल्ह्यात सध्या महायुतीमध्ये खटका उडालेला पाहायला मिळत आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी एकमेकांच्या मतदार संघात राजकीय कार्यक्रम घ्यायला सुरुवात केल्यामुळे अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी यांची चांगली चर्चा रंगू लागली आहे. काही दिवसापूर्वी मंत्री जयकुमार गोरे यांनी मकरंद पाटील यांच्या वाई मतदारसंघात बावधनमध्ये  एका कार्यक्रमात उपस्थिती लावून मंत्री मकरंद पाटील यांचे नाव न घेता टीका केली होती. यावेळी त्यांनी कोणीही बाभळीच्या झाडाखाली उभे राहत नाही त्याला आंब्याची सावली लागते. बावधन गावाची ताकद राजकारण बदलवण्याची आहे, आजची सभा परिवर्तनाची असल्याचे सांगत मंत्री जयकुमार गोरे यांनी नाव न घेता मंत्री मकरंद पाटील यांना डिवचले होते.

या घडामोडीनंतर आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील यांनी देखील उद्या मंत्री जयकुमार गोरे यांच्या मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम घेतल्यामुळे महायुतीमध्ये ठिणगी पडल्याची चर्चा सुरु आहे. या कार्यक्रमाविषयी मंत्री मकरंद पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी जयकुमार गोरे त्यांचा पक्ष वाढवत आहेत मी माझा पक्ष वाढवतोय. वाईचे मतदार मला नेहमीच वाढीव मताधिक्याने मतदान करतात. मी दोन,तीन  हजाराने निवडून आलो नाही. असा टोमणा देखील मंत्री मकरंद पाटील यांनी जयकुमार गोरे यांचे नाव न घेता लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या:

तुमच्यात दम असेल तर मैदानात या, नाव न घेता जयकुमार गोरेंचा रामराजे नाईक निंबाळकरांवर हल्लाबोल

आणखी वाचा

Comments are closed.