मल्याळम अभिनेते संतोष नायर यांचे कार अपघातात निधन, पत्नीची प्रकृती गंभीर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मल्याळम चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. लोकप्रिय मल्याळम चित्रपट अभिनेते संतोष नायर यांचे कार अपघातात वयाच्या 65 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या पत्नीची प्रकृतीही गंभीर असल्याचे वृत्त आहे. एका कार अपघातात संतोष नायर जखमी झाले होते. पथानामथिट्टा येथील एनाथजवळ त्यांच्या कारची एका ट्रकशी टक्कर झाली. अपघातानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु उपचारादरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्रकृती खालावली. त्यांच्या पत्नीवर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

संतोष नायर यांनी 1982 मध्ये ‘इथू नांगलुडे कथा’ या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. आपल्या पहिल्याच चित्रपटातून त्यांनी सिद्ध केले की ते अभिनयासाठीच बनले आहेत. आपल्या कारकिर्दीत त्यांनी 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी मुख्य भूमिका, खलनायक, सहायक पात्रे आणि विनोदी भूमिकाही साकारल्या. त्यांनी छोट्या पडद्यावरही आपल्या अभिनयाचे कौशल्य दाखवले. 10 एप्रिल रोजी संतोष नायर यांचा ‘मोहिनीअट्टम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तो त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला असे वृत्त एबीपी ने दिले आहे.

Comments are closed.