टिपू सुलतान फोटो प्रकरण ते बनावट जन्मदाखल्यांचा विषय, मालेगाव महापालिकेची पहिलीच महासभा गाजणार

मालेगाव महानगरपालिका: मालेगाव महापालिकेच्या महापौरपदावर (Malegaon Municipal Corporation Mayor Election 2026) इस्लाम पार्टीच्या (Islam Party) शेख नसरीन बानो खालिद (Shaikh Nasreen Bano Khalid) यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. महापौरपदासाठी झालेल्या थेट लढतीत शेख नसरीन बानो यांना एकूण 43 मते मिळाली, तर शिवसेनेच्या (Shiv Sena) उमेदवार लता सखाराम घोडके यांना 18 मतांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे शेख नसरीन बानो यांनी 25 मतांच्या फरकाने विजय संपादन केला. अशातच येत्या १८ फेब्रुवारीला मालेगाव महापालिकेची पहिलीच महासभा (First General Meeting) आहे. हि महासभा अनेक कारणांनी वादळी ठरण्याची शक्यता आहे. तर टिपू सुलतान फोटो प्रकरणी (Tipu Sultan Photo Controversy) देखील महासभेत गदारोळ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Fake Birth Certificates Case : बनावट जन्म दाखल्यांचा प्रश्न, तब्बल 1044 लोकांवर पोलिसांत गुन्हा

मालेगावात मागील दीड वर्षात रोहिंगे व बांगलादेशी प्रकरण तसेच बनावट जन्म दाखले प्रकरण चांगलेच गाजले. माजी खा.किरीट सोमय्या यांनी बनावट जन्म दाखल्यांचा प्रश्न लावून धरल्याने तब्बल 1044 लोकांवर पोलिसांत गुन्हा, तर 3045 जन्म दाखले बनावट असल्याचे ठरवून महापालिकेने ते रद्द केले आहे. मालेगावकरांवर विशेषतः अल्पसंख्याक असलेल्या मुस्लिम समाजावर हा अन्याय केला जात असल्याचा आरोप करत इस्लाम पार्टीचे मा.आसिफ शेख व समाजवादीचे मुश्तकिम डिग्निटी यांनी या प्रकरणाला थेट विरोध करत न्यायालय गाठलेहे. तर ज्या नागरिकांवर अन्याय होत आहे त्यांच्या पाठीशी भक्कम उभे राहिले आहे.

Tipu Sultan Photo Controversy : टिपू सुलतान फोटो प्रकरण, पुन्हा एकदा मालेगावचे वातावरण ढवळून निघणार?

दरम्यान, महापालिका निवडणुकीत या नेत्यांनी जनतेला या गुन्ह्याबाबत व रद्द केलेल्या जन्म दाखल्याबाबत निवडणुकीत आश्वासन दिले होते. त्यामुळे आज 18 तारखेला होणाऱ्या पहिल्याच महासभेत 1044 लोकांवर पोलिसांत दाखल झालेला गुन्हा व 3045 जन्म दाखले रद्द केले बाबत पहिलाच विषय घेण्यात आला आहे. यातील 3045 रद्द केलेले दाखले पुन्हा वितरीत करावे, यासाठी पहिल्याच महासभेत सत्ताधाऱ्यांकडून कायदेशीर मार्गाने ठराव केला जाणार असल्याची शक्यता आहे.एकूणच बनावट जन्म दाखले व टिपू सुलतान फोटो प्रकरणी पुन्हा एकदा मालेगावचे वातावरण ढवळून निघणार आहे.

Malegaon Election Result 2026: मालेगावातील पक्षीय बलाबल

इस्लाम पक्ष : 35
एमआयएम : 21
शिवसेना : 18
समाजवादी पक्ष : 5
काँग्रेस : 3
भाजप : 2

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Comments are closed.