दिल्लीत काय दिवे लावतो ते माहितेय, तुझी औकात नाही, मल्हार पाटलांनी ओमराजेंना डिवचलं

ओमराजे निंबाळकर यांच्यावर मल्हार पाटील: धाराशिव जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यात कायमच कलगीतुरा रंगल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. तुळजापूरचे नूतन नगराध्यक्ष पिटू गंगणे यांच्या स्वागत कार्यक्रमात राणा जगजितसिंह पाटील पाटील यांचे सुपुत्र मल्हार पाटील यांनी ओमराजे निंबाळकर यांच्या जोरदार हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळालं. ओम्याची औकात नाही, दिल्लीत काय दिवे लावतो माहित आहे असं म्हणत मल्हार पाटलांनी ओमराजे  निंबाळकर यांना पुन्हा डिवचलं.

शेंबड्या पोरांबद्दल यापुढे बोलायचं नाही

शेंबड्या पोरांबद्दल यापुढे बोलायचं नाही, असे म्हणत मल्हार पाटलांची खासदार ओमराजे निंबाळकरांवर जहरी टीका. तुळजापूरच्या मातीची बदनामी करायची हा याच्या प्रचाराचा मुद्दा होता. मात्र, आई भवानीने तो पुसून काढल्याचे मल्हार पाटील म्हणाले. तुळजापूरचे नूतन नगराध्यक्ष पिटू गंगणे यांच्या स्वागत कार्यक्रमात मल्हार पाटलांनी ओमराजे निंबाळकरांवर हल्लाबोल केला. ओम्याची औकात नाही, दिल्लीत काय दिवे लावतो माहित आहे. शेंबड्या पोरांबद्दल यापुढे बोलायचं नाही असं म्हणत मल्हार पाटलांची खासदार ओमराजे निंबाळकरांवर जहरी टीका केली.

तुझी औकात असेल तर आईस्क्रीम कोणचा अध्यक्ष बसव

तुळजापूरच्या मातीची बदनामी करायची हा याच्या प्रचाराचा मुद्दा होता. मात्र, आई भवानीने तो पुसून काढला. तुळजापुरात नूतन नगराध्यक्ष पिटू गंगणे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आयोजित स्वागत समारंभात मल्हार पाटलांनी ओमराजे निंबाळकरांवर हल्लाबोल चढवला. यापूर्वीही मल्हार पाटलांनी जिल्हा परिषदेवर भाजपचा अध्यक्ष बसवणार तुझी औकात असेल तर आईस्क्रीम कोणचा अध्यक्ष बसव असं म्हणत मल्हार पाटील ओमराजे निंबाळकर यांना ओपन चॅलेंज दिलं आहे.

आणखी वाचा

Comments are closed.