वडिलांच्या वयाच्या दिग्दर्शकानं माझं जबरदस्ती चुंबन घेण्याचा प्रयत्न केला; कास्टिंग काऊचबाबत मालती चहरचा मोठा गौप्यस्फोट

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज दीपक चहर याची बहीण आणि अभिनेत्री मालती चहर ही नुकतीच ‘बिग बॉस-19’मध्ये दिसली. तिने अनिल शर्मा याच्या ‘जीनियस’ या फिल्ममधून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते. हा चित्रपट काही विशेष चालला नव्हता. मात्र ‘बिग बॉस-19’मुळे ती घराघरात पोहोचली. आता तिने एका मुलाखतीमध्ये सिनेसृष्टीतील काळी बाजू उघड केली आहे. वडिलांच्या वयाच्या दिग्दर्शकाने जबरदस्ती आपले चुंबन घेण्याचा प्रयत्न केल्याचा गौप्यस्फोट मालती हिने केला.

Comments are closed.