ममता सरकारने पुरोहितांच्या मानधनात वाढ केली आहे

राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ताही लागू

वृत्तसंस्था/ कोलकाता

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी केवळ तासभर अगोदर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुजारी आणि मुएझिन (प्रार्थनेसाठी अजान देणारे) यांच्या मानधनात 500 रुपयांची वाढ केली. आता त्यांना दरमहा 2000 रुपये मिळतील. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी दुपारी सोशल मीडियावर मानधन वाढीसंबंधी पोस्ट व्हायरल केली. तसेच मानधन योजनेअंतर्गत पुजारी आणि मुएझिनसाठी सर्व नवीन अर्जांना सरकारने मान्यता दिली आहे. त्याव्यतिरिक्त  राज्य कर्मचाऱ्यांना मार्च 2026 पासून त्यांचा प्रलंबित महागाई भत्ता मिळेल

असे जाहीर करत मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक मोठी घोषणाही केली. यासंबंधी राज्य वित्त विभागाने देयक प्रक्रिया आणि नियमांची रुपरेषा स्पष्ट करणाऱ्या सविस्तर अधिसूचनाही जारी केल्या आहेत. ममता बॅनर्जी यांनी घेतलेले हे दोन्ही निर्णय येत्या विधानसभा निवडणुकीत फायदेशीर ठरतील असे दिसत आहे.

Comments are closed.