स्कॅनिंग रुममध्ये प्रवेश करताच आक्रित घडलं, पत्नीच्या डोळ्यादेखत MRI मशीनमध्ये अडकून पतीचा अंत
एमआरआय मशीन अपघात: थोडीशी गाफीलता आणि निष्काळजीपणा कुणाच्या मृत्यूचं कारण ठरू शकतो, याचंच उदाहरण अमेरिकेतील लाँग आयलंड येथून पुढे आले आहे? यात एका व्यक्तीचा एमआरआय मशीनमध्ये अचानक ओढला गेल्याने दुर्दैवी मृत्यू (MRI Machine Accident) झाला आहे. वेस्टबरीच्या नासाऊ येथे 61 वर्षीय कीथ मॅकअॅलिस्टर या पुरूषाचा एमआरआय मशीनमध्ये अडकून मृत्यू झाला आहे? या दुर्दैवी घटनेची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. अमेरिकेतील लाँग आयलंड येथील ही धक्कादायक घटना असल्याची माहिती पुढे आली आहे.
पत्नीच्या डोळ्यादेखत MRI मशीनमध्ये अडकून पतीचा अंत
दरम्यान, यात मृत व्यक्तीच्या गळ्यात मोठी वेट-ट्रेनिंग चेन घालून खोलीत प्रवेश केल्यानंतर आणि ते एमआरआय मशीनजवळ मेटलची चेन घालून गेले असता तेव्हा हा प्रकार घडल्याची माहिती आहे. पोलिसांनी आणि त्याच्या पत्नीने स्थानिक टेलिव्हिजन आउटलेटला सांगितले तेत्याने हा अपघात होण्यापूर्वी हात हलवून निरोप घेतल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांना अनेक हृदयविकाराचे झटके आले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. न्यू यॉर्कमधील लाँग आयलंड येथील वेस्टबरी येथील नासाऊ ओपन एमआरआयमध्ये एमआरआय मशीनमध्ये ओढण्यात आल्याचे नासाऊ काउंटी पोलिसांनी सांगितले. बुधवारी दुपारी नासाऊ ओपन एमआरआयमध्ये स्कॅन सुरू असताना 61 वर्षीय हा माणूस एमआरआय रूममध्ये शिरला होता. नासाऊ काउंटी पोलिस विभागाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, मशीनच्या तीव्र चुंबकीय शक्तीने त्याच्या गळ्यातील धातूच्या साखळीने त्याला आत ओढले गेले असल्याचा अंदाज व्यक्त केला गेलाय?
गळ्यात 20 पाऊंड वजनाची धातूची साखळी, शक्तिशाली चुंबकाने थेट आत ओढलं
पुढे आलेल्या माहितीनुसार कीथ मॅकअॅलिस्टर जेव्हा स्कॅनिंग रूममध्ये प्रवेश केला तेव्हा त्याच्या गळ्यात 20 पाऊंड वजनाची धातूची साखळी होती. त्याच्या पत्नीने सांगितले की तो वजन प्रशिक्षणासाठी ती साखळी वापरत होता. खोलीत प्रवेश केल्यानंतर काही वेळातच, एमआरआय मशीनच्या शक्तिशाली चुंबकाने त्याला अचानक आत ओढले. मी त्याला टेबलाकडे येताना पाहिले आणि नंतर मशीनने त्याला आत ओढले, असंही तिने सांगितलं. तसेच, तिने आरोप केला आहे की, जर त्याच्या गळ्यात मेटलची साखळी होती तर संबंधितांनी तिच्या पतीला खोलीत कसे येऊ दिले. याला जबाबदार संबंधित अधिकारी आहेत, असा दोष किथ मॅकलिस्टर यांच्या पत्नीने केला आहे?
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.