विडी पिण्याच्या वादातून एकाची हत्या, गांधी इस्पितळातील घटना

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

विडी पिण्याच्या कारणावरून दोघा मजुरांमध्ये जोरदार शाब्दीक बाचाबाची झाली. त्याचे पर्यवसान हामरीतुमरीत झाले आणि एकाने दुसऱयाच्या डोके आणि कानावर हातोडय़ाने मारहाण केली. यात गंभीर जखमी झालेल्या मजुराचा मृत्यू झाला.

परळच्या महात्मा गांधी इस्पितळ येथील लेबर क्वॉटर्समध्ये ही घटना आज घडली. राजीव योगी यादव (34) असे मृतकाचे नाव आहे. राजीव आणि त्याची हत्या करणारा आरोपी रामजी हे दोघे इस्पितळात कंत्राटी मजूर म्हणून काम करत होते. शिवाय दोघे एकाच घरात राहत होते. दोघांमध्ये विडी पिण्यावरून वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की राजीवच्या कान व डोक्यावर रामजीने हातोडय़ाने मारहाण केली. गंभीर जखमी राजीववर तत्काळ इस्पितळात उपचार सुरू करण्यात आले. पण दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी रामजी याला अटक केली.

Comments are closed.