जैन मंदिरांना प्रत्येकी पाच सिलिंडर द्या! लोढा यांचे छगन भुजबळांना पत्र
मलबार हिलमधील 16 जैन मंदिरांना प्रत्येकी पाच गॅस सिलिंडर द्या, अशी मागणी राज्याचे काwशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे. त्यांच्या या मागणीमुळे वाद निर्माण झाला आहे.
लोढांच्या मागणीला ‘आम्ही गिरगावकर’ संघटनेने आक्षेप घेतला आहे. ‘लोढा एकाच समाजाचा उदोउदो करतात. त्यांनी फक्त जैन मंदिरांसाठी गॅसची मागणी केली, इतर मंदिरांसाठीही त्यांनी मागणी करायला हवी. राम नवमीच्या दिवशी अनेक ठिकाणी भंडारा झाला नाही. त्यावेळी लोढा यांना हे का सुचलं नाही,’ असा सवाल आम्ही गिरगावकर यांनी केला.
Comments are closed.