कॅनिंगसाठी आंब्याला प्रतिकिलो 50 रूपये भाव; शिवसेनेच्या आंदोलनाला यश

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हवामानातील बदलामुळे आंबा बागायतदार संकटात असतानाच कॅनिंग कंपन्यांनी आंब्याचे दर पन्नास टक्क्यांनी कमी केले आहेत. त्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते, माजी आमदार बाळ माने यांनी बागायतदारांवर झालेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवत कॅनिंग कंपन्यांच्या दरात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. शिवसेनेच्या आक्रमक पावित्र्यामुळे कोकणात वातावरण ढवळून निघाले आहे. त्यामुळे सोमवारी पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत कॅनिंग कंपन्यांनाना प्रतिकिलो ५० रूपये भाव देण्याच्या सूचना केल्या आहेत.

या निर्णयामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या आंदोलनाला यश आले आहे. काही दिवसांपूर्वीच शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी, शिवसेना उपनेते माजी आमदार आमदार बाळ माने, राजापूरच्या नगराध्यक्षा हुस्नबानू खलिफे यांनी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांना निवेदन देऊन आंबा कॅनिंग कंपन्यांकडून होत असलेल्या अन्यायाचा पाढा वाचला होता. कॅनिंग कंपन्यांनी आंब्याचे दर पन्नास टक्क्यांनी कमी केले आहेत. परजिल्ह्यातील आंबा खरेदी केला जात असल्याचे तक्रार करण्यात आली होती. तसेच किमान प्रतिकिलो ७५ रूपये आंब्याला दरवाढ करण्याची मागणी केली होती. अखेर आता ३२ रूपये प्रति किलो वरून पन्नास रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

Comments are closed.