भुजबळांसाठी त्यांचा मुलगा अन् पुतण्या इतकेच ओबीसी, जातीयवादाचे ढोंग मला अजिबात मान्य नाही; माणि
छगन भुजबळांवर माणिकराव कोकाटे : मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे (NCP Ajit Pawar Group) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर छगन भुजबळ यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. यानंतर आज छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची सागर बंगल्यावर भेट घेतली. या दोघांमध्ये तब्बल 40 मिनिटे चर्चा देखील झाली. आता भुजबळ-फडणवीस भेटीनंतर राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
माणिकराव कोकाटे म्हणाले की, भुजबळांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली ही चांगली गोष्ट आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांनी आपल्या मनातलं शल्य बोलून दाखवला असेल आणि मुख्यमंत्र्यांनी त्यावर तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं असेल, तर मुख्यमंत्री बोलल्याप्रमाणे करतील. मंत्रिमंडळात 42 मंत्र्यांपैकी 17 मंत्री हे ओबीसी तर 16 मंत्री मराठा आहेत. ओबीसींना समान न्याय देण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली. त्यामुळे कोणावरही अन्याय होणार नाही, अशी त्यांची भूमिका असल्याने त्यांचं स्वागत आहे, असे त्यांनी म्हटले.
भुजबळांसाठी त्यांचा मुलगा अन् पुतण्या इतकेच ओबीसी
ते पुढे म्हणाले की, भुजबळांच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना जो निर्णय घ्यायचाय तो ते घेऊ शकतात. भुजबळांना काय वाटतं त्यांच्या मनात काय हे कोण सांगेल? त्यांना ओबीसी म्हणून त्यांचा मुलगा आणि त्यांचा पुतण्या एवढेच दिसत असेल. दुसरे ओबीसी दिसत नसतील तर त्याला काय करणार? चूक असेल तर समजूत काढणार ना. चूकच नसेल तर समजूत कशाची काढणार? भुजबळांना मंत्रिपद न देऊन आमच्या पक्षाची कुठल्याही प्रकारची चूक झालेली नाही. आमच्या पक्षाने जो न्याय भुजबळांना दिला तो आतापर्यंत कोणत्याही पक्षाने दिला नाही. राज्यातील गावांमध्ये ओबीसी आणि मराठा बांधव एकत्रितपणे राहतात, काम करतात, एकमेकांवर त्यांचा विश्वास आहे. समाजा-समाजात तेढ निर्माण करणं हा विचारच मला पटत नाही. जातीयवादाचे ढोंग मला अजिबात मान्य नाही. भुजबळ यांना मंत्रिपद मिळावं म्हणून मी मध्यस्थी करणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Comments are closed.