भाजपमध्ये गेले की आमदार होतात, मीच कसा झालो नाही? तो पक्ष माझ्यासाठी लकी नव्हता; मंत्री माणिकरा
मणक्राव कोकेटे: भाजपमध्ये (BJP) गेले अन् तिकीट मिळाले की आमदार होतो, मीच कसा आमदार झालो नाही? मला तो पक्ष लकी नव्हता, अशी फटकेबाजी राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी केली. सिन्नर विधासभा मतदारसंघातून सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या सर्वपक्षीय नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातून ते बोलत होते.
माणिकराव कोकाटे म्हणाले की, मी निवडणूक लढवणार नव्हतो. माझी मुलगी निवडणुकीला उभी राहणार होती. मात्र, तिनेच सांगितले तुम्ही उभे राहा, तुम्ही ज्येष्ठ आहात. तुम्हाला मंत्रिपदाची संधी आहे, असे म्हटले आणि मी आता मंत्री आहे. आधी काँग्रेसचे तिकीट घेऊन आलं की मंत्री आमदार व्हायचे, आताही तसेच आहे. भाजपमध्ये गेले अन् तिकीट मिळाले की आमदार होतो, मीच कसा आमदार झालो नाही? मला तो पक्ष लकी नव्हता, असे त्यांनी म्हटले.
मला भाजप धार्जिणा नाही
मी शिवसेनेच्या विरोधात आंदोलन केले. पण, नंतर बाळासाहेब ठाकरे यांनी मला टिळा लावून प्रवेश देत हातात आमदारकीचे तिकीट दिले आणि मी निवडून आलो. शिवसेनेमध्ये एकही शेतकऱ्यांची जाण असणारा आमदार नव्हता. तेव्हा राणे एकच होते, ते म्हणाले माझ्या बरोबर येतो का? मग त्यांच्या मी त्यांच्या बरोबर गेलो. मोदींच्या काळात तिकिट घ्या निवडून या असे झाले, मीच कसा निवडून आलो नाही? मला हा पक्ष धार्जिणा नाही. रामाला 14 वर्ष वनवास झाला. मला 28 वर्ष झाला. माझा 28 वर्षाचा वनवास अजित दादांनी दूर केला, असेही माणिकराव कोकाटे म्हणाले.
नाशिकचा शेतकरी हुशार
माणिकराव कोकाटे पुढे म्हणाले की, कृषी खात 100 टक्के लोकांशी संबंधित आहे. अन्नधान्य कसे नैसर्गिकपणे बनवता यईल, रासायनिक खतांचा वापर कसा कमी होईल यासाठी प्रयत्न करणार आहे. नाशिकचा शेतकरी हुशार, प्रयोगशील आहे. पाणी मर्यादित आहे, त्यामुळे कमी पाण्यात शेती कशी होणार? याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. 31 टक्क्यांपेक्ष जास्त बागायती होणार नाही, 70 टक्के शेती जिरायती आहे, त्या दृष्टीने पिके घेतली पाहिजेत, असे मार्गदर्शन त्यांनी यावेळी उपस्थितांना केले.
अजितदादा अजब रसायन
कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जाऊन या, त्यानंतर आपल्याला कळते आरोग्य काय आहे. मी संपूर्ण राज्यात फिरतोय, जिथे जागा मिळेल तिथे बसतो, कामे करतो. अजितदादा अजब रसायन आहे. कृषी क्षेत्रात एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. ड्रोन, रोबोटद्वारे शेती करता येईल. जीवन संस्कृती बदलल्याशिवाय उपयोग होणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
आणखी वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.