Latur News – मांजरा नदीने धोक्याची पातळी ओलांडली; पूरस्थितीने बळीराजा हतबल, सर्वसामान्य सुन्न

लातूर जिल्ह्यात शिरूर अनंतपाळ तालुक्यातील मौजे उजेड परिसरातील मांजरा नदीला महापूर आला आहे. मांजरा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. शेत शिवारातून पाणी वाहत असल्याने या प्रकोपापुढे बळीराजा हतबल झाला आहे. नजर जाईल तिथपर्यंत पाणीच पाणी दिसत आहे.

मराठवाडा चिखलात; फडणवीस म्हणाले, ओल्या दुष्काळाचे काय… नियमामध्ये आहे ती सगळी मदत देऊ

मांजरा नदीचे पाणी पात्राच्या बाहेर पडले आहे. यामुळे हजारो हेक्टरवर शेतीमधील पिकं गिळंकृत करून पाणी पुढे सरकत आहे. नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सर्व जलमय झाले आहे. बळीराजाच नव्हे तर सर्व सामान्य नागरिकही सुन्न झाला आहे.

Beed News – नद्यांना महापूर, पूल पाण्याखाली, रस्ते उद्ध्वस्त, शेती भुईसपाट; परतीच्या पावसामुळे बीड जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत

Comments are closed.