Manoj Jarange admitted to Galaxy Hospital in Chhatrapati Sambhajinagar due to weakness rrp
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ जालना शहरात आज (10 जानेवारी) जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यानंतर मोर्चाचे सभेत रुपांतर झाल्यानंतर मनोज जरांगे यांनी मंचावर बसणे टाळले आणि सभेत भाषण करण्यासही नकार दिला. पण सभा संपल्यानंतर मनोज जरांगे यांची तब्येत बिघडली, त्यामुळे त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जालना : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ जालना शहरात आज (10 जानेवारी) जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे देखील मोर्चात सहभागी झाले, मात्र मोर्चाचे सभेत रुपांतर झाल्यानंतर त्यांनी मंचावर बसणे टाळले आणि सभेत भाषण करण्यासही नकार दिला. पण सभा संपल्यानंतर मनोज जरांगे यांची तब्येत बिघडली, त्यामुळे त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Manoj Jarange admitted to Galaxy Hospital in Chhatrapati Sambhajinagar due to weakness)
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 9 जानेवारी रोजी एक महिना पूर्ण झाला. हत्येतील एक आरोपी अजूनही फरार आहे. धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आणि या हत्येतील संशयित वाल्मिक कराड हा पोलिसांना शरण आला आहे. पण त्याच्यावर अद्याप हत्येचा गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे. लातूर आणि पुणे येथे निघालेल्या मोर्चात मनोज जरांगे हे सहभागी झाले होते. यानंतर आज ते जालना येथील मोर्चातही सहभागी झाले. मात्र मोर्चाचे सभेत रुपांतर झाल्यानंतर त्यांनी मंचावर बसणे टाळले आणि सभेत भाषण करण्यासही नकार दिला. पण सभा संपल्यानंतर अशक्तपणा जाणवत असल्याने मनोज जरांगे यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.
– Advertisement –
हेही वाचा – Santosh Deshmukh Murder : धस यांचा उल्लेख करत सुषमा अंधारे म्हणतात, हे आपल्या आकांच्या हाती!
माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे म्हणाले की, माझी तब्यत दोन दिवसांपासून बरी नाही. आज छत्रपती संभाजीनगर येथे तपासणीसाठी जाण्याचे निश्चित होते. आयोजकांनी मोर्चात सहभागी होण्याचा आग्रह केला, म्हणून मोतीबागेपासून मोर्चात सहभागी झालो. मात्र माझी कंबर दुखत असून पायऱ्या चढायला आणि उतरायला त्रास होतो आहे. त्यामुळे रुग्णालयात मला दाखल करण्यात आले. पण उद्या धाराशिव येथे जनआक्रोश मोर्चा आहे. मी त्या मोर्चाला जाणार आहे, अशी माहिती मनोज जरांगे यांनी दिली.
– Advertisement –
डॉक्टर काय म्हणाले?
दरम्यान, अशक्तपणा जाणवत असल्याने मनोज जरांगे यांना छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मनोज जरांगे यांच्या तब्येतीविषयी माहिती देताना गॅलेक्सी रुग्णालयाचे डॉक्टर प्रदीप चावरे म्हणाले की, मनोज जरांगे यांचा बीपी कमी आहे. तसेस त्यांना पाठदुखीचा देखील त्रास आहे. म्हणून त्यांचे सिटी स्कॅन करण्यात येणार आहे. रिपोर्ट आल्यावर त्यांच्यावर पुढचे उपचार केली जातील, अशी माहिती प्रदीप चावरे यांनी दिली.
हेही वाचा – Local Government Bodies : महायुतीचे संकेत देताना उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा, म्हणाले…
Comments are closed.