Manoj Jarange makes serious allegations against Dhananjay Munde, mentioning OBCs rrp


भाजपा आमदार सुरेश धस यांच्यासह सर्वपक्षीय नेते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. अशातच आज मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

धाराशिव : बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आठ आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई केली जाणार असल्याची माहिती आहे. मात्र या हत्येप्रकरणी संशयित आणि मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराड याला मकोका कारवाईतून वगळण्यात आले आहे. असे असले तरी भाजपा आमदार सुरेश धस यांच्यासह सर्वपक्षीय नेते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. अशातच आज मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. (Manoj Jarange makes serious allegations against Dhananjay Munde mentioning OBCs)

धाराशिवमध्ये आज संतोष देशमुख हत्या आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी मूक मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चाचे सभेमध्ये रुपांतर झाल्यानंतर मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, धनंजय मुंडे त्यांच्या गुंडांच्या टोळीच्या माध्यमातून असंच करत राहिले तर पुढच्या काळात आपल्याला सुद्धा सावध राहावं लागणार आहे. कारण सगळं पाप झाकण्यासाठी धनंजय मुंडे ओबीसींचं पांघरून घेत आहेत. पण यात ओबीसींचा काय संबंध? तुम्ही (धनंजय देशमुख) धमकी देता, मग आम्ही गुंडाबद्दल बोलायचं नाही का? तुम्ही कोणत्या दिशेने घेऊन जात आहात हे सर्व? असा प्रश्नांचा भडीमार जरांगे पाटील यांनी केला.

– Advertisement –

हेही वाचा – Santosh Deshmukh Case : आरोपींना फाशी देण्याचे काम सरकारचे, देशमुख प्रकरणी खासदार निंबाळकर आक्रमक

मनोज जरांगे म्हणाले की, आंदोलन करायचं नाही, प्रतिमोर्चे काढायचे नाही, असे तुम्ही सांगता. तुमच्या (धनंजय मुंडे) घरातील कोणी मेल्यावर किंवा मारून टाकल्यावर आम्ही प्रतिमोर्चे काढायचे का? तुम्ही जाळात हात घालू नका. तुम्ही असाच त्रास देत राहिलात, तर मराठ्यांना उठाव करावा लागेल. माझा नाईलाज आहे. कारण मी जातीवाद करत नाही. पण, मराठ्यांसह संतोष देषमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्यासाठी न्याय मागताना जर कोणाला जातीवाद वाटत असेल, तर बिनधास्त वाटू द्या. पण मी न्याय घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. परंतु ओबीसींचे नेते मराठ्यांच्या अंगावर घालून त्यांना आंदोलन करायला लावणार असाल तर लक्षात ठेव वेळ प्रत्येकावर येते, असा इशारा मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांना दिला.

– Advertisement –

हेही वाचा – Supriya Sule : नगरपालिका हे कार्यकर्त्यांचे हक्काचे इलेक्शन, त्यामुळे…; राऊतांच्या विधानावर सुळेंचा टोला



Source link

Comments are closed.