Manoj Jarange Maratha Morcha LIVE: मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल; पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात
Manoj Jarange Maratha Morcha LIVE: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईची वाट धरली आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलन सुरु केले आहे. मनोज जरांगे आता थेट मुंबईच्या दिशेने कूच केलीय. मराठा आंदोलक आज सकाळी मनोज जरांगे मुंबईत पोहोचले आहेत. जरांगेंसह मराठा कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईत पोहोचले आहे. मनोज जरांगे आज मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत. या आंदोलनासाठी आझाद मैदानात जय्यत तयारी करण्यात आलीय. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. तर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीतही बदल करण्यात आले आहेत.
Comments are closed.