आमची घरं उद्ध्वस्त केली तर आम्हीही मागे लागणार, भुजबळांमुळे ओबीसी उद्ध्वस्त होणार; मनोज जरागेंच
छगन भुजबळ वर मनोज जारानरेंगे: मराठा आरक्षणाच्या जीआरच्या (Maratha Reservation GR) विरोधात राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. यानंतर गेल्या काही दिवसांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. सोमवारी छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटलांचा अभ्यास किती? त्याचं शिक्षण काय? तो मराठ्यांचा लीडर नाही, असे म्हणत जोरदार हल्लाबोल केला होता. आता मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांवर टीकास्त्र डागले आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. मनोज जरांगे वारंवार भडकावू भाषण करत आहे. राज्य सरकारने मनोज जरांगेंवर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी केली आहे. याबाबत विचारले असता मनोज जरांगे पाटील म्हणाले की, छगन भुजबळ ज्ञानेश्वरी सांगतो का? अंबाडा येथे कोयते काढू म्हणाला होता. त्याच्यावर गुन्हे दाखल करा. भडकावू भाषण तुम्ही केलं. जातीवाद डोक्यात असल्याने मराठ्यांवर अन्याय केला. 1990 मध्ये माधव पॅटर्न आणला. मराठ्यांना त्रास द्यायचा होता. अन्याय करणाऱ्यांना अंगावर घ्याव लागते आणि मी घेणार आहे, असे आव्हान त्यांनी दिले.
Manoj Jarange on Babanrao Taywade: तुम्ही बोलला तर आम्ही सोडणार नाही
राज्य सरकार ओबीसी किंवा इतर समाजाच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करते मग मनोज जरांगेंवर का नाही? असा सवाल उपस्थित करत राज्य सरकारची ही भेदभावपूर्वक भूमिका योग्य नसल्याची खंत बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केली. याबाबत विचारले असता मनोज जरांगे पाटील म्हणाले की, तुम्ही तसे वागतात म्हणून गुन्हे दाखल करतात. हे लोक ओबीसी नेते नाही. ते एक जातीचे नेते आहे. मी जो आरोप केला तोच आरोप भुजबळ करतो. अंतरवाली येथे शांततेत आंदोलन सुरू असताना कोयते काढायची भाषा आम्ही केली नाही. तुम्ही बोलला तर आम्ही सोडणार नाही. मतदानासाठी मार खाऊन जगायचं का? असा सवाल यावेळी मनोज जरांगे पाटलांनी उपस्थित केला.
Manoj Jarange on Chhagan Bhujbal: भुजबळांमुळे ओबीसींचं वाटोळं होणार
मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, आमची घरं उद्ध्वस्त केली तर आम्हीही मागे लागणार आहोत. भुजबळांमुळे ओबीसींचं वाटोळं होणार आहे. आम्ही मराठे म्हणतो, ओबीसी आमचेच मात्र ते काहीच म्हणत नाही. प्रत्येकाचे काचेचे घर आहे हे लक्षात ठेवा. त्या पवार साहेबांनी मराठ्यांना आरक्षण दिलं असतं तर बरं झालं असते. जशास तसे आता वागावेच लागेल आणि आम्ही वागू. त्यांना धडा शिकवू. आता मराठा समाजाने समजून घ्यावे. आता माघार नाही, असे म्हणत त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला.
Manoj Jarange: जरांगे उपचार घेत असलेल्या रुग्णालयाबाहेर पोलिसांचा फौजफाटा
दरम्यान, मनोज जरांगे सध्या ज्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्या ठिकाणी अचानक पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. दोन अधिकारी, दहा पेक्षा अधिक कर्मचारी 24 तास तैनात करण्यात आले आहेत. दोन महिला कर्मचाऱ्यांचा देखील यात समावेश आहे. गेल्या दोन दिवसांपासून ओबीसी नेते आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये टोकाची टीका होत आहे. यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांच्या वतीने दक्षता घेतली जात आहे.
https://www.youtube.com/watch?v=3cmtaxezeom
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.