Manoj jarange patil attacks dhananjay munde after resign minister post said his happy santosh deshmukh murder
छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानतो. उशिरा का होईना त्यांनी धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला. कारण, इतका क्रूर हत्या घडवून आणणारा माणूस सरकारमध्ये आहे. त्यामुळे सरकारची बदमानी होतेय, याची जाणीव त्यांना झाली असेल, असे मराठा नेते, मनोज जरांगे-पाटील यांनी म्हटले आहे. ते एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते.
शासकीय बंगल्यावर खंडणीचे व्यवहार
मनोज जरांगे-पाटील म्हणाले, “बहुतेक अजितदादा आणि फडणवीस यांना चोरून धनंजय मुंडे कामे करत असावा. मंत्रिपदाचा गैरवापर करून खंडण्या वसूल करण्याचे काम मुंडे करत होता. शासकीय बंगल्यावर सुद्धा खंडणीचे व्यवहार केले जात होते. टवाळखोर पोर पकडून खून, खंडणी, व्यसन लावायची. हे प्रकार अजितदादा आणि फडणीवासांना माहीत नसावे. संतोष देशमुख यांचे फोटो समोर आल्यानंतर धनंजय मुंडेला कंबरेत लाथ घालून बाहेर काढले.”
आरोपी धनंजय मुंडेची लोक
“धनंजय मुंडे हा 302 चा आरोपी आहे. कारण, हे आरोपी धनंजय मुंडेची लोक आहेत. वाल्मिक कराड हा पैसा पुरवायचा. तर धनंजय मुंडे राजकारण सांभाळत होता. कंबरेत लाथ घालून बाहेर काढले, तसेच 302 चा गुन्हा दाखल करून मुख्य आरोपी करा. कराडने एकट्याने हे पाप डोक्यावर घेऊन मरू नये. कारण, धनंजय मुंडेने हे पाप केले आहे. कराडने पैसा मुंडेसाठी कमावला आहे. कराडच्या कुटुंबाला सांगतो, आतापर्यंत परळीत खून झाले, हे पाप केले ते धनंजय मुंडेसाठी केले आहेत,” असे जरांगे-पाटील यांनी म्हटले.
धनंजय मुंडेला अजूनही पश्चाताप नाही
“धनंजय मंडे हा खूप माजोरडा आहे. ही मस्तीखोर लोक आहे. संतोष देशमुख यांचे फोटो व्हायरल झाल्यावर राज्य हळहळ व्यक्त करत आहे. पण, धनंजय मुंडेला अजूनही पश्चाताप नाही. संतोष देशमुखांच्या खूनाचा धनंजय मुंडेला आनंद वाटतोय. ‘संतोष देशमुख यांचे क्रूर फोटो बाहेर आल्यानंतर मला सहन न झाल्यानं राजीनामा देतोय,’ असे धनंजय मुंडे सांगत नाही. तो म्हणतोय दुखतंय म्हणून दिला. आरोपींनी व्यक्त केलेल्या आनंदापेक्षा जास्त आनंद धनंजय मुंडे व्यक्त करतोय,” अशी टीका जरांगे-पाटील यांनी केली आहे.
धनंजय मुंडे सत्तेसाठी हपापला
“धनंजय मुंडेला मुख्य आरोपी करावे. धनंजय मुंडे तुरूंगात गेल्याशिवाय राज्य सुखात राहत नाही. अजून काहींना सहआरोपी केले पाहिजेत. धनंजय मुंडे 302 च्या गुन्ह्यात 100 टक्के निघणार. हा धनंजय मुंडे सत्तेसाठी हपापला आहे. यांना पैशांच्या पलीकडे काही दिसत नाही. ही माजुर्डी टोळी आहे. आमचे कुणीच काही करू शकत नाही, असे टोळीला वाटत होते. त्यांना माहिती नाही, मनोज जरांगेसारखा पठ्ठ्या बसला आहे. अर्धी टोळी तुरूंगात घातली आहे,” असे जरांगे-पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा : ‘अबू आझमीसारख्याला औरंगजेबाच्या कबरी शेजारी झोपवले पाहिजे,’ नितेश राणे भडकले
Comments are closed.