हत्येचा कट, अडीच कोटींची सुपारी; मनोज जरांगेंनी थेट धनंजय मुंडे यांचे नाव घेतले, सर्व प्लॅनच सांगितला

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट उघडकीस आला आहे. जरांगे-पाटील यांच्या हत्येसाठी अडीच कोटींची सुपारी देण्यात आली होती. या प्रकरणी दोघांना अटकही करण्यात आली असून आता याला राजकीय वळण मिळाले आहे. शुक्रवारी सकाळी पत्रकार परिषद घेत जरांगे-पाटील यांनी थेट माजी मंत्री धनंजय मुंडे यांनीच मला मारण्याचा कट रचल्याचा खळबळजनक आरोप केला.

Comments are closed.