माझ्या घरावरती हल्ला करू शकतात, मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी अलीकडेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर 500 कोटींचा ऑडिओ बॉम्ब फोडला. ही ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर राज्यच राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. यातच आज त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना. यावेळी त्यांनी माझ्या घरावरती हल्ला करू शकतात, अशी भीती व्यक्त केली आहे.

मनोज जरांगे-पाटील म्हणाले आहेत की, “मी इमानदारीने गरिबांची पोरं मोठी करतोय, त्यांना नोकऱ्या लावतोय, आरक्षण मिळवून देतोय. रोज झटतोय, रक्त जाळतोय. माझ्यासाठी पावलापावलावरती संकट आहे. एवढा त्रास आणि यातना भोगून, समाजाच्या लेकरांना सुख मिळावं म्हणून मी हे सगळं करतोय. मी या दुःखातून पायवाट काढतोय, चालतोय. या प्रचंड वेदनेतून, या जाळातून मी या समाजासाठी चालतोय; कारण माझ्या समाजाच्या लेकराबाळांचं कल्याण व्हावं. त्यांच्यावर या जाळातून जाण्याची वेळ कधी येऊ नये, त्यांच्यावर कधी संकट येऊ नये, ती कधी उन्हात भाजू नयेत आणि त्यांचं आयुष्य बरबाद होऊ नये, म्हणून मी या जाळातून चालतोय. माझ्यासमोर पावलापावलावरती संकटे आहेत. मग ते हे का करून घेतायत? ते १०० टक्के माझ्या घरावर हल्ला करू शकतात, कारण हे खूप मोठं नेटवर्क आहे.”

ऑडिओ क्लिपबद्दल बोलता मनोज जरांगे-पाटील म्हणाले की, “मी दिलेली ऑडिओ क्लिप माझ्या अगोदर व्हायरल झालेली आहे, रामदास कदम यांनीच ती क्लिप व्हायरल केली. त्यामुळे, रामदास कदम यांची चौकशी झाली पाहिजे, त्यांच्याजवळच सगळं आहे.” ते म्हणाले, “मी क्लिप दिल्यावर त्या सोर्सची सगळी हमी आणि जबाबदारी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घ्यावी. या प्रकरणापुरता फडणवीस आणि शिंदे यांच्यावर मला विश्वास आहे.”

Comments are closed.