धनंजय मुंडेंसह सर्वांचीच नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग करा; पोलीस अधीक्षकांना मनोज जरांगे यांचे निवेदन

आमदार धनंजय मुंडे यांनी त्यांच्यासह मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंगची मागणी केली होती. ते आव्हान मनोज जरांगे यांनी स्वीकारले. धनंजय मुंडे, माझी, माझ्या खुनाचा कट रचणारे आरोपी, या सर्वांचीच नार्को टेस्ट व ब्रेन मॅपिंग करण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन दिले.

या नार्को टेस्टमुळे संतोष देशमुख, महादेव मुंडे, गीते व इतर काही प्रकरणात धनंजय मुंडे क्रिमिनल माईंड आहेत. हे किमान माझ्यामुळे तरी उघडकीस येईल, असे आंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले, कर नाही त्याला डर कशाला? त्या सामूहिक कटाचा सूत्रधार धनंजय मुंडे असेल. आमचे लोक हाताखाली धरायचे, पुन्हा आमच्या विरोधात त्यांचा वापर करायचा आणि खोटं सांगायचं ते लोक त्यांचेच आहे म्हणून. तुझी खोडच मोडायची आहे, असेही मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले.

माझ्यासह आरोपी व धनंजय मुंडे या सर्वांची नार्को टेस्ट करावी, म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होईल, असेही ते म्हणाले. शिष्टमंडळाने अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांना निवेदन दिले. जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधी व न्याय विभागाकडे तक्रार करणार असल्याचेही मनोज जरांगे यांनी सांगितले.

Comments are closed.