आमची हXXXची व्यवस्था सदावर्तेच्या घरी करा; मुंबईत पाय ठेवताच मराठा आंदोलक भडकला
मनोज जरेंगे पाटील मुंबई मोर्चा: मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो समाजबांधवांचा महामोर्चा अंतरवाली सराटीतून बुधवारी (दि.27) सकाळी दहा वाजता मुंबईकडे रवाना झाला. आज (29 ऑगस्ट) सकाळी मनोज जरांगे यांच्यासह हजारो मराठा आंदोलक मुंबईत दाखल (Manoj Jarange Mumbai Morcha) झाले आहेत. तर दुसरीकडे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा समाजाच्या या आंदोलनाला मोठा विरोध दर्शवला होता. या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मुंबईत दाखल होताच त्यांनी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासह राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय.
आमची हXXXची व्यवस्था सदावर्तेच्या घरी करा
मराठा आंदोलकांनी एबीपी माझा माझाशी बोलताना म्हणाले की, आमचा एक आरोप आहे की शिंदे साहेबांना बोलू दिले जात नाही. शिंदे साहेबांनी जे आरक्षण दिले आहे ते कुठे आहे? वाशीमध्ये आम्हाला चॉकलेट देताना फडणवीस यांनी कुठली चॉकलेट खाल्ली होती याचा विचार करावा. आमच्या 58 लाख नोंदी सापडल्या आहेत तर रीतसर आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळाले पाहिजे अन्यथा आम्ही मुंबईत मरू. आम्ही गावाला जाणार नाही. आमची हXXXची व्यवस्था सदावर्तेच्या घरी करा.सदावर्ते कुठे आहे? अशी संतप्त प्रतिक्रिया एका आंदोलकाने दिली आहे.
गाड्यांवर दोन-दोन हजारांचे दंड लावताय
आम्ही इथे दोन-दिवस तीन दिवसापासून आलेलो आहोत. आमची कुठल्याही प्रकारची सोय झालेली नाही. मुंबईत आल्यानंतर आमच्या गाड्यांवर दोन-दोन हजारांचे दंड लावण्यात येत आहेत. उगीचच आमच्यावर दंड आकारले जात आहेत, असा आरोप देखील एका आंदोलकाने केला आहे.
आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जाणार नाही
आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे आहे. मात्र ओबीसी समाज म्हणतोय की, तुम्हाला ओबीसीतून आरक्षण का पाहिजे? कारण ओबीसीला 27 टक्के आरक्षण आहे. त्यातले अर्धे आरक्षण हे माळी समाजाने घेतलेले आहे. माळी समाज हा 32 टक्के असून त्यांनी सुमारे 19 टक्के आरक्षण घेतले आहे. त्यामुळे आमच्या समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावे. सरकार आमची अजून किती फसवणूक करणार आहे. यावेळेस आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जाणार नाही. एक इंच देखील आम्ही मागे हटणार नाही, असा भावाने देखील आंदोलकांनी व्यक्त केल्या आहेत.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या? (What are the exact demands of Manoj Jarange Patil?)
1. मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.
2. हैदराबाद गझेटियर लागू करा…13 महिन्यापासून त्यांचा अभ्यासच सुरू आहे, असं मनोज जरांगेंनी सांगितले. आम्हाला साताराबाँबे गॅझेटियर लागू करावे, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.
3. सगे सोयरेचा अध्यादेश काढून दीड वर्ष झाले, तरी मराठा संयमी आहे. त्याची व्याख्या दिली आहे. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या…सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे.
4. सरसकट गुन्हे मागे घेणार होते. आमच्यावरच मार खाऊन केसेस झाल्या…अजून केसेस मागे घेतल्या नाहीत. मराठा बांधवांनी आरक्षणासाठी बलिदान दिले आहेत. त्यांचे कुटुंब उघड्यावर आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.
5. आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या…, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.
https://www.youtube.com/watch?v=ge0327Si3ue
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.