Manoj jarange patil on devendra fadnavis santosh deshmukh case beed morcha-ssa97
Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांना म्हणावं, टाकाना राव, कपा-कप उचलून आरोपींना तुरुंगात… तुम्हाला काय डिझेल विकत आणायचं आहे का? असा सवाल जरांगे-पाटील यांनी विचारला आहे.
संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी आरोपींना तातडीनं अटक करण्यात यावी. अन्यथा हे लोण महाराष्ट्रभर पसरणार आहे. 50 मंत्री आले तरी हा मनोज जरांगे-पाटील प्रकरण दाबून देणार नाही. संतोष देशमुखांना न्याय मिळेपर्यंत बीड जिल्ह्यातील एकाही जनतेनं मागे हटायचं नाही, असा एल्गार मराठा नेते, मनोज जरांगे-पाटील यांनी पुकारला आहे.
बीडमधील संतोष देशमुख यांच्याासाठी आयोजित केलेल्या मूक मोर्चात मनोज जरांगे-पाटील बोलत होते.
जरांगे-पाटील म्हणाले, “आमदार अभिमन्य पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याजवळचे असल्याचं मला कळलं. जवळचे आहेत, म्हणल्यावर उद्यापर्यंत संतोष देशमुख यांच्या आरोपींना आत टाकण्यास सांगतील, अशी आशा आपण व्यक्त करू.”
– Advertisement –
हेही वाचा : मनोज जरांगे-पाटलांची फडणवीसांना वॉर्निंग; म्हणाले, “तर आम्हाला…”
“मुख्यमंत्र्यांना म्हणावं, टाकाना राव, कपा-कप उचलून आरोपींना तुरुंगात… तुम्हाला काय डिझेल विकत आणायचं आहे का? कणा-कण जायचं आहे.. भर गभाळ कोच आत.. भर गभाळ कोच आत… द्यायचं टाकून सगळे.. डिझेलला पैसे लागत असतील, तर मी देऊ का…” असंही जरांगे-पाटलांनी म्हटलं.
– Advertisement –
“मुख्यमंत्र्यांना सांगा हे साप आहेत.. यांना कितीही दूध पाजले तर वर तंगडी करतात… यांना मुख्यमंत्र्यांनी पोसू नये… तुम्ही पोसलं, तर आम्ही चरबी उतरवणार… आपण चरबी उतरवणार असल्याचं सांगितलं तर उतवरत असतो…”, असा सल्ला आणि इशारा जरांगे-पाटलांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिला आहे.
हेही वाचा : “देशमुखांच्या आरोपींमागे आका असो किंवा आकी, साडेसातीला एकदाच…”, जरांगे-पाटील इरेला पेटले
Comments are closed.