Manoj jarange patil on santosh deshmukh case devendra fadnavis suresh dhas-ssa97
सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जावे. जेवढ्या लोकांची संतोष देशमुख प्रकरणात नावे आहेत, त्यांना तुरुंगात टाकावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करावी. आरोपींमागे आका असो किंवा आकी असो, या साडेसातीला एकदाच तुरुंगात टाका. आम्ही तुमच्यामागे आहोत, असं मराठा नेते, मनोज जरांगे-पाटील यांनी म्हटलं आहे.
मनोज जरांगे-पाटील बीडमधील संतोष देशमुख यांच्याासाठी आयोजित केलेल्या मूक मोर्चात बोलत होते. यावेळी बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येवरून बरेच राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यावरूनही जरांगे-पाटील यांनी टोलेबाजी केली आहे.
– Advertisement –
हेही वाचा : अजितदादांच्या आमदारानं वाल्मिक कराडची सगळी प्रकरणं काढली, धनंजय मुंडेंना ‘टार्गेट’ करत म्हणाले…
जरांगे-पाटील म्हणाले, “मी काय करतोय, मी काय करणार यापेक्षा माझ्या समाजानं काय ठरवलं हे महत्त्वाचं आहे. मी हटणार नाही, हा शब्द दिला आहे. मात्र, बीडमध्ये राजकीय लै खेचाखेची आहे. आमचं राहिलं बाजूला, पण इकडे लै अवघड कचका आहे.”
– Advertisement –
“सुरेश धस यांनी बोलताना म्हटलं, ‘तुम्हाला जे ट्रोल करत होते, तेच मला करत आहेत.’ परंतु, अण्णा ( सुरेश धस ) मला ट्रोल करणाऱ्यांना मी क**** क**** घो*** लावत होतो. मी मोजत नसतो. माझ्या जातीवर कुणी अन्याय केला तर सोडत नसतो. तो कितीही जहांगीरदार असुद्या.”
“जो आमदार, खासदार समाजाच्या बाजूनं बोलत असेल मग तो भाजप, काँग्रेस, शिवसेना किंवा अन्य पक्षाचा असुद्या, त्यामागे जातीच्या सर्व लोकांनी उभे राहिले पाहिजे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जावे. जेवढ्या लोकांची संतोष देशमुख प्रकरणात नावे आहेत, त्यांना तुरुंगात टाकावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करावी. आरोपींमागे आका असो किंवा आकी असो,” असा आक्रमक पवित्रा जरांगे-पाटील यांनी घेतला आहे.
हेही वाचा : “कराडला घो*** लावल्याशिवाय शांत नाही बसणार, मुंडेंना…”, नरेंद्र पाटील संतापले; फडणवीसांनाही विचारला सवाल
Comments are closed.