मराठा आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, मनोज जरांगे पाटील म्हणाले, आमचे दोन बळी घेतले,
मनोज जारानरेंज पावेल: मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं, या मागणीसाठी काल (27 ऑगस्ट) अंतरवाली सराटी येथून मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) मुंबईच्या दिशेने रवाना झाले. आज सकाळी ते शिवनेरीवर पोहोचले असून, त्यानंतर त्यांनी पुन्हा मुंबईकडे आंदोलनासाठी कूच केले आहे. मात्र, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जुन्नरजवळ एका मराठा आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. सतीश देशमुख असे त्या मृत व्यक्तीचे नाव असून, मनोज जरांगेंच्या मुंबईतील उपोषणाला सुरूवात होण्याआधीच ही दुर्दैवी घटना घडल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. आता यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
फडणवीससाहेब आरक्षण दिले तर…
मनोज जरांगे पाटील एबीपी माझाशी बोलताना म्हणाले की, मला आता माहिती कळाली की आमचा देशमुख नावाचा बांधव प्रवासात असताना त्यांचा दम छाटला आणि त्यांना अटॅक आला. मी याबाबत अजूनही माहिती घेत आहे. परंतु ही घटना अत्यंत दुःखद आहे. याला जबाबदार फडणवीस साहेब आहेत. तुम्ही आता आम्हाला आरक्षण दिले तर आमचे बळी जाणार नाहीत. आमचे आणखी दोन बळी घेतले आहेत. लातूरला परवाच्या दिवशी अशीच घटना घडली आहे. आज देखील अशीच घटना घडली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
सरकार मुद्दाम मराठा विरोधी काम करतंय
मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीबाबत विचारले असता ते म्हणाले की, माझ्यासाठी समाज आणि समाजाची लेकरं समाधानी, सुखी करणे ही जबाबदारी आहे. ती मी पूर्ण क्षमतेने पार पाडत आहे, असे त्यांनी म्हटले. माझी शिवनेरीवरची ही शेवटची भेट असू शकते असं भावनिक वक्तव्य मनोज जरांगे यांनी केले. याबाबत विचारले असता मी माझ्या समाजाच्या पोरं बाळांसाठी लढत आहे. त्यांच्या वेदना खूप अवघड आहेत. त्यांनी आमच्यावर विश्वास टाकलेला आहे. म्हणून आम्ही इकडे आंदोलनाला आलेलो आहोत. ते सगळे पाठीमागून बाजू सांभाळत आहेत. वेळ पडली तर त्यांनी देखील गाड्या लावून ठेवल्या आहेत. सर्व धान्य भरून ठेवलेले आहे. ते देखील ताकदीने लढायला तयार आहेत. त्यामुळे आपली भूमिका विजय मिळवून देणे हीच असते. पण, सरकार आडमुठे आहे. मुद्दाम मराठा विरोधी काम करत आहे. पुढचं काही सांगता येत नाही. पण, मी सावध आहे. जिंकणार आहे, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या? (What are the exact demands of Manoj Jarange Patil?)
1. मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.
2. हैदराबाद गझेटियर लागू करा… 13 महिन्यापासून त्यांचा अभ्यासच सुरू आहे, असं मनोज जरांगेंनी सांगितले. आम्हाला साताराबाँबे गॅझेटियर लागू करावे, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.
3. सगे सोयरेचा अध्यादेश काढून दीड वर्ष झाले, तरी मराठा संयमी आहे. त्याची व्याख्या दिली आहे. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या…सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे.
4. सरसकट गुन्हे मागे घेणार होते. आमच्यावरच मार खाऊन केसेस झाल्या…अजून केसेस मागे घेतल्या नाहीत. मराठा बांधवांनी आरक्षणासाठी बलिदान दिले आहेत. त्यांचे कुटुंब उघड्यावर आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.
5. आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या…, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.
https://www.youtube.com/watch?v=p-9qgahhruo
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.