ही आरपारची लढाई, कितीही दिवस लागू दे, असं लढायचं की… मनोज जरांगे मराठा आंदोलकांना म्हणाले…

मनोज जरेंगे आणि देवेंद्र फड्नाविस: हिंदू देव-देवतांना पुढे करुन मराठा समाजाला विनाकारण त्रास दिला जात आहे. आम्ही हिंदू असूनही आमच्या सणांच्या नावाखाली आम्हाला रोखले जात आहे. आज ज्यांना हिंदुत्त्वाशी देणंघेणं नाही, धर्माशी देणंघेणं नाही,ज्यांना फक्त राजकारणासाठी हिंदुत्त्व लागतं, ते खोटे हिंदू लोक हिंदू धर्म चालवणाऱ्यांनाही अडवत आहेत. हिंदू धर्माखाली मराठ्यांची अडवणूक का केली जात आहे, याचे उत्तर अमित शाह आणि पंतप्रधान मोदी यांनी द्यावे. यासाठीच तुम्ही राज्यात देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदी बसवले आहे का, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी विचारला. ते बुधवारी अंतरवाली सराटी येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी आपल्याला आज 10 वाजता मुंबईकडे कूच करायचे आहे, असे मराठा आंदोलकांना सांगितले. तसचे जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली.

मराठा आंदोलक शांततेत मुंबईला येत असताना हिंदू असूनही त्यांना त्रास दिला जात आहे. राज्य सरकारलाच सणाच्या दिवशी अशांतता पसरवली जात आहे. आम्ही काय धिंगाणा घालायला किंवा जमिनी घ्यायला मुंबईत येत आहोत का? मग आम्हाला अडवण्याचा अट्टाहास का? राज्य सरकार हिंदूविरोधी वागत आहे. आम्हालाही कळतं की, हिंदू सणात अडथळे नको. गणेशोत्सवाला गालबोट लागेल, असं पाऊल आम्ही मेलो तरी उचलणार नाही. मात्र, देवेंद्र फडणवीस यांना त्यांची चूक झाकायची आहे, म्हणून मराठ्यांची अडवणूक केली जात आहे. देवी-देवतांच्या आडून गोरगरीब मराठ्यांवर अन्याय करणे आम्ही खपवून घेणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी ठणकावून सांगितले.

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी जाणीवपूर्वक कोर्टात याचिका टाकून नवा कायदा काढला: मनोज जरांगे पाटील

मुंबई उच्च न्यायालयाने आपल्याला आझाद मैदानात आंदोलनाची परवानगी थेट नाकारलेली नाही. आपण आता न्यायालयात परवानगीसाठी अर्ज करतोय.  न्यायालयाने अचानक नवा कायदा काढला. आपण गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील मराठा मोर्चाची माहिती दिली होती. आपण आमरण उपोषण करणार असल्याचे सांगितले होते.  त्यामुळे आपल्याला कुठेही अडवणे शक्य नव्हते. त्यामुळे 2025 सालचा एक कायदा पुढे करुन आपल्याला परवानगी नाकारण्यात आली. आपल्याला नोटीस देण्यात नाही, नवीन कायदा आपल्याला माहितीच नव्हता. काल दुपारी 3 वाजता निकाल आला आणि आज आपल्याला निघायचे आहे. देवेंद्र फडणवीसांच्या लोकांनी याचिका केली, त्यांचाच महाअधिवक्ता उभा राहिला आणि त्यांनी पाहिजे तसा निकाल लावून घेतला. सरकारने दहशतवाद्यांसारखे डाव खेळू नयेत. ही लोकशाही नाही. इंदिरा गांधींच्या काळातही लोकांना अडवलं नाही, ते आता फडणवीसांच्या काळात अडवले जात आहे, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली.

Maratha Reservation: ही आरपारची लढाई, कितीही दिवस लागू दे, संयम सोडायचा नाही: मनोज जरांगे पाटील

मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांना संबोधित केले. यावेळी त्यांनी म्हटले की, आपण सगळे जण मुंबईच्या दिशेने लगेच निघायचं, थांबायचे नहाी. आपण आझाद मैदानावर कायद्याच्या कक्षेत राहून आंदोलन करायचे आहे. 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजता आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरु होईल. आपल्याला उचकण्याचा प्रयत्न केला जाईल, खुनशी वागणूक दिली जाईल, पण शांत डोक्याने राहायचं. आता आरपारची शेवटची लढाई आहे, दम धरुन बाजी जिंकू शकतो. कितीही दिवस लागू दे, पण संयम सोडू नका. अशी लढाई कधी जगाच्या पाठीवर झाली नसेल इतक्या डोक्याने ही लढाई जिंकायची आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांना सांगितले.

https://www.youtube.com/watch?v=Drs-2zyaxby

आणखी वाचा

मनोज जरांगेंचा मराठा मोर्चा मुंबईला निघण्यापूर्वी मोठी अपडेट, पोलिसांकडून 40 अटींचं पत्र

आणखी वाचा

Comments are closed.