धनंजय मुंडेंवर कलम 302 लावा, तुरुंगात टाका; मनोज जरांगे पाटील यांची मागणी

संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांना सहआरोपी करा. 302 चा गुन्हा दाखल करून त्यांना तुरुंगात टाका, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मंत्री धनंजय मुंडे यांनी आज राजीनामा दिला. यानंतर माध्यमांशी संवाद साधता मनोज जरांगे पाटील यांनी ही मागणी केली आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, ”मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी करतो की, याचा तपास पुन्हा होणं गरजेचं आहे. पुरवणी तपास होईल, त्यात 100 – 150 जण आहेत. ते सहआरोपी झाले पाहिजेत. यात धनंजय मुंडे सुद्धा सहआरोपी झाले पाहिजे. दुसरी मागणी अशी की, दोन ते तीन महिन्यातच या प्रकरणाचा निकाल लावा. आरोपींना भर चौकात गोळ्या घालाव्यात.”
ते म्हणाले, ”सरमाडे हा जो आरोपी आहे, त्याने कबुल करावे की मी धनंजय मुंडेसाठी खंडणी मागितली आणि पाप केलं. त्याच्या कुटुंबियांनाही माझं म्हणणं आहे की, त्याने धनंजय मुंडे यांच्यासाठीच खंडणी मागितली. त्याच्या कुटुंबियांना माझं म्हणणं आहे की, तुमच्या डोक्यावर पाप घेऊन मरू नका.”
Comments are closed.