छत्तीसगडमध्ये माओवादी नेत्याला अटक केली

वृत्तसंस्था/ रायपूर

राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) छत्तीसगडमधील दहशतवादी निधी प्रकरणात बंदी घातलेल्या सीपीआय-माओवादी दहशतवादी संघटनेशी संबंधित एका वरिष्ठ नेत्याला अटक केली आहे. मुलवासी बचाओ मंचचा (एमबीएम) नेता रघु मिदियामी याला गुरुवारी रात्री ताब्यात घेतल्यानंतर पुढील कार्यवाही केली जात आहे. रघु मिदियामी हा ‘एमबीएम’चा नेता आहे. ही संघटना सीपीआय -माओवादीच्या भारतविरोधी अजेंड्याला पुढे नेण्यासाठी निधी गोळा करणे, साठवणे आणि वाटप करण्यात गुंतलेली आहे. छत्तीसगड सरकारने यापूर्वीच मुलवासी बचाओ मंचवर बंदी घातली आहे. एनआयएच्या तपासानुसार रघु मिदियामी हा सीपीआय-माओवादी गटाच्या नेतृत्त्वाखालील निदर्शनांसाठी स्थानिक पातळीवर निधी वाटपाचे काम पाहत होता.

छत्तीसगड पोलिसांनी यापूर्वी नोव्हेंबर 2023 मध्ये या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली होती. फेब्रुवारी 2024 मध्ये एनआयएने ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याविरुद्ध आरोपपत्रही दाखल केले होते. पोलिसांनी दोन्ही आरोपींकडून 6 लाख रुपये रोख जप्त केले होते. ते एमबीएमचे ओव्हरग्राउंड वर्कर्स म्हणून ओळखले जात होते.

Comments are closed.