Maratha Reservation – मनोज जरांगेंचा ‘चलो मुंबई’चा नारा, आमरण उपोषण करणार; गर्वात वागू नका, मुख्यमंत्री फडणवीसांना दिला इशारा

शांततेत उपोषण केल्याशिवाय माझ्या समाजाला न्याय मिळणार नाही. मी उपोषण केलं की तुम्ही रुसता. तुम्ही रुसायचं नाही, तुमच्या मुलांसाठी मी हे करतोय, असं म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. 29 ऑगस्ट 2025 रोजी मुंबईत जाऊन आमरण उपोषणाला सुरुवात करणार असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे माध्यामांशी संवाद साधला. आमरण उपोषणाची तारीख जाहीर करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे. ते म्हणाले की, दोन वर्षे झाले तरीही आम्ही संयमाने घेत आहोत. मागच्या वेळी उपोषण सोडताना चार मागण्यांची तत्काळ अंमलबजावणी करण्यात येईल, असं सांगितलं होतं. तीन महिने झाले तरी कुठल्याही मागण्यांची अंमलबजावणी झाली नाही. संयम तरी किती दिवस धरायचा. 29 ऑगस्ट 2025 ला आम्ही मुंबईत जाणार आहे. मुंबईत गेल्याशिवाय पर्याय निघणार नाही, हे आमच्या लक्षात आलं आहे. सगळ्या मराठा बांधवांनी 29 ऑगस्टच्या अगोदर काम करून ठेवावं. आता माघार घ्यायची नाही. सरकारने आपली शंभर टक्के फसवणूक केली आहे. तसेच पुढील आंदोलनाची दिशा एक ऑगस्ट रोजी सांगणार आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Caste Census देशात जातीनिहाय जनगणना होणार, विरोधकांच्या मागणीला यश

मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी बोलताना मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे. ते म्हणाले की, माणसाच्या डोक्यात एकदा खुन्नस बसली की, सत्ता बदलल्यावर लोकं बदला घेतात. आमच्याशी खूनशीपणाने आणि आकसाने वागू नका. तुमची सत्ता आली तसं तुमची सुद्धा सत्ता पलटेल, गर्वात वागू नका. तुम्ही गॅझेटीयर, केसेस, मराठा आणि कुणबी एक आहेत याचे अध्यादेश तातडीने काढा. नोंदी सापडलेले प्रमाणपत्र तातडीने द्यायला सुरुवात करा, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला.

पाकव्याप्त कश्मीर ताब्यात घेणे हाच एकमेव उपाय, हिंदुस्थानी वंशाच्या ब्रिटिश माजी खासदाराचे मत

Comments are closed.