मराठा आरक्षण पुढील सुनावणी 11 डिसेंबरला

मराठा समाजाच्या दहा टक्के आरक्षणाविरोधात दाखल झालेल्या याचिकांवर 11 डिसेंबरला पुढील सुनावणी होणार आहे.  न्या. रवींद्र घुगे, न्या. संदीप मारणे व न्या. निजामुद्दीन जमादार यांच्या पूर्ण पीठासमोर या याचिकांवर एकत्रित सुनावणी सुरू आहे. या आरक्षणाला विरोध करणाऱया याचिकांच्या वतीने ऍड. प्रदीप संचेती यांचा युक्तिवाद शुक्रवारी पूर्ण झाला. पुढील सुनावणीपासून वरिष्ठ वकील अनिल अंतुरकर व अन्य वकील आपली बाजू मांडण्यास सुरुवात करतील. दरम्यान, गेल्या वर्षी राज्य शासनाने मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण जाहीर केले. या आरक्षणाविरोधात डझनभर याचिका दाखल झाल्या आहेत. या आरक्षणाच्या समर्थनार्थ अनेक अर्ज दाखल झाले आहेत. यावर पूर्ण पीठासमोर एकत्रित सुनावणी सुरू आहे.

Comments are closed.