मराठी अभिनेत्याने उचलले टोकाचे पाऊल, चित्रपट प्रदर्शनापूर्वीच संपवले जीवन

मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सचिन चांदवडेने (25) असे त्या अभिनेत्याचे नाव असून त्याने राहत्या घरी गळफास घेत जीवन संपवले.
पुणे आयटी पार्कमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेला सचिन हा जमतारा या नेटफ्लिक्सवरील प्रसिद्ध वेबसिरीजमध्ये झळकला होता. तसेच आता आगामी जमतारा 2 वेबसिरीजमध्ये आणि असुरवन या चित्रपटात त्याने भूमिका केल्या आहेत. हे दोन्ही चित्रपट लवकरच रिलीज होणार आहेत.
सचिन हा पुण्याला एका प्रतिष्ठीत कंपनीत कामाला होता. तो दिवाळीनिमित्त त्याच्या जळगाव जिल्ह्यातल्या पारोळा तालुक्यातील उंदिरखेडे गावी आला होता. तिथे त्याने 24 ऑक्टोबर रोजी गळफास घेतला. त्याच्या कुटुंबियांना ते समजताच त्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. तिथून पुढील उपचारासाठी धुळे येथेही उपचार सुरू होते. मात्र तीन दिवसानंतर अखेर त्याची प्राणज्योत मालवली.

Comments are closed.