‘तो आला आणि त्याने अचानक माझ्या…’, प्रिया बापटने सांगितला छेडछाडीचा धक्कादायक प्रसंग

मराठी सिनेसृष्टीतली प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बापट सध्या हिंदी सिनेमात आपलं वर्चस्व गाजवतेय. मराठीसोबतच हिंदीतही तिचा बोलबाला आहे. सध्या तिच्या एका आगामी चित्रपटामुळे ती चर्चेत आली आहे. प्रिया बापटचा आगामी चित्रपट ‘बिना लग्नाची गोष्ट’ 12 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय. यामद्ये तिने तिच्यासोबत घडलेला भयंकर अनुभव शेअर केला आहे.

अभिनेत्री प्रिया बापटने ‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. यामध्ये प्रिया बापटने तिच्यासोबत घडलेल्या एका किळसवाण्या प्रकारावर भाष्य केलं आहे. याविषय़ी बोलताना ती म्हणाली, ही घटना 2010 मध्ये दादरमध्ये घडली. एक दिवस मी शूटिंग संपून घरी जात होते. त्यावेळी मी मैत्रिणीसोबत फोनवर बोलत होते. माझ्या हातात सामान होतं. फोनवर बोलतत बोलत मी चालली होती. तितक्यात अचानक एक माणून माझ्या समोर आला आणि त्याने माझ्या स्तनांना स्पर्श केला आणि क्षणात तिथून निघून गेला. क्षणभर मला समजलचं नाही नेमक काय झालं. मी त्याला मागे वळून पाहिलं, तेव्हा तो माणूस गायब झाला होता, असं प्रिया यावेळी म्हणाली.

“मी खूप घाबरले आणि रडतच घरी पोहोचले. मी घरी गेले तेव्हा आई घरी नव्हती. मला रडताना पाहून बाबांनी मला विचारल काय झालं? तेव्हा मी सगळं सांगितलं. त्यांनाही फार वाईट वाटलं, पण त्या क्षणी काहीच करता येत नव्हतं. पण त्याच दिवसापासून मी ठरवलं की, कोणी माझ्याशी चुकीचं वागलं किंवा वाईट नजरेने पाहिलं, तर त्याला गप्प बसून सोडायचं नाही. तो राग आजही माझ्या मनात तसाच आहे, असं प्रिया बापटने पुढे सांगितलं.

प्रियाचा तो सीन पुन्हा चर्चेत
प्रिया बापट मराठी सोबत हिंदीतही चर्चेत राहिलीए. सिटी ऑफ ड्रिम्स या वेबसिरीजमधील तिचा लेस्बियन किसिंग सीन वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. आता पुन्हा एकदा एका नवीन सिरीजमुळे ती चर्चेत आहे. Andhera या वेबसिरीजमध्ये प्रिया बापट पुन्हा एकदा लेस्बियन किसिंग सीन देताना पाहायला मिळाली आहे.

Comments are closed.