Marathi Sahitya Sammelan another part held in Railway, Writer Ashish Ningurkar appreciated by Minister Uday Samant


मुंबई : नवी दिल्ली येथील 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पुणे ते दिल्ली रेल्वे प्रवासादरम्यान फिरत्या चाकांवर प्रवासी साहित्य संमेलन भरले. या रेल्वेतील साहित्य संमेलनात लेखक आशिष निनगुरकर यांच्या कवितांना उस्फुर्त दाद मिळाली. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी देखील आशिष निनगुनकरांच्या कवितांना दिलखुलास दाद दिली व कौतुक केले. लेखक आशिष निनगुरकर यांचे ‘लालबत्ती ते कारंबा’ हे पुस्तक दिल्लीतील साहित्य संमेलनात प्रकाशित होणार आहे. याकरिता सुद्धा त्यांचे अभिनंदन करण्यात आले. दिल्लीतील छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरी, तालकटोरा स्टेडियम येथे हे ९८ वे साहित्य संमेलन सुरू आहे. या संमेलनात सहभागी होणाऱ्या साहित्य रसिकांसाठी पुणे ते दिल्ली अशी विशेष रेल्वे सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. (Marathi Sahitya Sammelan another part held in Railway, Writer Ashish Ningurkar appreciated by Minister Uday Samant)

अखिल भारतीय मराठी संमेलनासाठी दिल्लीला जाण्याकरिता विशेष रेल्वे बुधवारी, 19 फेब्रुवारी रोजी दुपारी पुण्यातून निघाली. राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी या संमेलनाचे स्वागताध्यक्ष भूषविले व ‌‘मराठी साहित्ययात्री संमेलनात‌’ सहभागी होत त्यांनी सर्व लेखक, कवी व इतर निमंत्रकांसोबत रेल्वेतून प्रवास केला. याच रेल्वेच्या बोगी नंबर 11 विशालगड यामध्ये चपराक प्रकाशनची संपूर्ण टीम बसली होती. त्यात येथील लेखक आशिष निनगुरक व त्यांचे कुटूंब उपस्थित होते. ‘मराठी साहित्ययात्री संमेलनात‌’ महाराष्ट्रातील विविध भागांमधून साहित्यिक, युवक, लोककलाकार, स्टँडअप कॉमेडियन्स, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स तसेच शाहिरी व भजनी मंडळांचा मोठ्या संख्येने समावेश होता.

16 डब्यांच्या विशेष रेल्वेच्या या प्रवासारदम्यान प्रत्येक बोगीत विविध साहित्यिक-सांस्कृतिक कार्यक्रम घेतले गेले. त्यात या संमेलनात आशिष निनगुरकर यांनी कविसंमेलनात त्यांच्या कविता सादर केल्या. यावेळी त्यांच्यासोबत डॉ.राजेंद्र सोमवंशी, प्रशांत केंदळे, ज्योती पाटील व उन्मुख कृष्णसागर आदींनी आपल्या बहारदार कवितांनी ट्रेनमधील सर्वांची मने जिंकून घेतली. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी सर्वांचे विशेष असे कौतुक केले व रेल्वे साहित्य संमेलनात हे अनमोल हिरे गवसल्याचे संगितले. दोन दिवस फिरत्या चाकावरील साहित्य संमेलनात कवी आणि लेखकांनी खरी रंगत भरली. चाकावरील सर्व डब्यात विचार चक्रांना चांगलाच वेग आल्याचे रसिकांना अनुभवायला मिळाले. यामुळे या साहित्य यात्री संमेलनात चांगलीच रंगत आली. साहित्ययात्री रेल्वे संमेलनाचे अध्यक्ष शरद तांदळे यांनी या ट्रेनमध्ये विशेष अशी सोय केली होती.

हेही  वाचा… Marathi Sahitya Sammelan : साहित्य संमेलनात राजकीय विषय नको, महामंडळाच्या बैठकीत वाद

आयोजकांकडून या रेल्वेच्या प्रत्येक डब्यात एक स्पीकर, माईक आदि साहित्य पुरवले. यामुळे काही वेळातच 16 डब्यातून कविता, कथा, चारोळी, अनुभव कथन, गीते यांच्या बहारदार मैफली सुरू झाल्या. राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून आलेल्या कवींनी साहित्य रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. या कविता ऐकून अनेक नवोदित कवींनाही कंठ फुटला. काही लेखकांनी आपल्या बहारदार कथा ऐकवून वातावरणात एक वेगळाच माहोल निर्माण केला. काही बालगोपाल यांनी धमाल उडवून दिली. त्यात देवांश निनगुरकर यांनी म्हंटलेल्या अथर्वशीर्ष, शिवतांडव स्तोत्र व लहान मुलांच्या गाण्यांना प्रचंड दाद मिळाली. त्यावेळी विविध वयोगटातील मंडळी आपल्या कला सादर करताना दिसले.

संवादिनी, तबला आणि टाळांच्या गजरात सुरू झालेल्या भजनांनी वातावरण प्रसन्न झाले. प्रत्येक डब्यात हा गजर सुरू असल्याने फिरत्या चाकांना जणू एका दिंडीचे स्वरूप आले होते. सकाळी हे भजन कीर्तन सुरूच होते. दुपारी परत एकदा कथा – कवितांना जोर चढला आणि दोन दिवसांचा हा प्रवास फिरत्या चाकावरील साहित्ययात्री संमेलनाने अधिक सुखकर केला. फिरत्या चाकांवरील हे आगळेवेगळे साहित्य संमेलन अविस्मरणीय असेच ठरले. फिरत्या चाकांवर आशिष निनगुरकर यांनी सादर केलेले विनोद, कविता, कथा, गीते, चारोळ्या ऐकून रसिकांचे मन तृप्त झाले. त्यांचे त्याबद्दल अभिनंदन होत आहे. दिल्लीतील मुख्य साहित्य संमेलन पार पडल्यानंतर परतीच्या प्रवासात देखील हे साहित्ययात्री संमेलन रंगणार असून पुणे रेल्वे स्थानकावर या अनोख्या संमेलनाची सांगता होईल.



Source link

Comments are closed.