वसुली थांबवा, कर्जमाफी जाहीर करा! पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांची सरकारला सूचना
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारने आपत्ती निवारणाची महत्त्वपूर्ण कामे तातडीने हाती घ्यावीत अशा सूचना करतानाच, शेतकऱ्यांकडून होणारी कर्जवसुली थांबवून त्यांना कर्जमाफी जाहीर करा, अशी सूचना महायुती सरकारला केली आहे.
पूरग्रस्त भागात सरकारने मदतकार्य हाती घेतले असले तरी बहुतांश शेतकऱ्यांपर्यंत अद्याप मदत पोहोचली नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यातच बँकांनी शेतकऱ्यांना कर्जवसुलीच्या नोटिसा बजावायला सुरुवात केल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. त्यावर शरद पवार यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून काही उपाययोजना सुचवल्या आहेत.
पीक विमा योजनेतील पात्रतेचे निकष शिथिल करावेत, जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना विमा लाभ मिळेल. खासगी विमा कंपन्यांकडून टाळाटाळ व दिरंगाई होणार नाही, याकडे सरकारने लक्ष द्यावे. वित्तीय संस्थांकडून कर्जदार शेतकरी व व्यवसायिक यांच्याकडून होणारी वसुली तत्काळ तहकूब करावी आणि शेतकरी व व्यावसायिक यांना दिलासा देण्यासाठी संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
z पिकांची पुनर्पेरणी व पुनर्लागवड तसेच फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठी विशेष मदत करावी.
z वाहून गेलेली किंवा नापीक झालेली जमीन सुधारण्यासाठी विशेष आराखडा तयार करावा. लहान-मोठे बंधारे, सिंचन कालवे, विहिरी, पंपिंग यंत्रणा व इतर सिंचन साधनांची दुरुस्ती व गाळ काढण्याची तसेच शेतकऱ्यांच्या बांध-बंदिस्तीची कामे हाती घ्यावीत.
z आपत्तीग्रस्तांना मानसिक धक्क्यातून सावरण्यासाठी समुपदेशन शिबिरे आयोजित करावीत.
इतर माहिती…
पंचनाम्यांच्या आधारे नुकसानीचा अहवाल राज्य शासनास सादर केल्यानंतर नव्याने निदर्शनास आलेल्या नुकसानाची दखल घेतली जात नाही. अतिवृष्टीनंतर काही दिवसांनी ऊन पडल्यामुळे भिंती-छपरांना भेगा जाऊन घरे व इतर वास्तू यांची पडझड होते. पाणी ओसरल्यानंतर पिके व पशूधन व इतर बाबींची हानी निदर्शनास येते. अशा नुकसानीचेदेखील पंचनामे होऊन आपद्ग्रस्तांना नुकसाभरपाई मिळावी यासाठी पंचनामा प्रक्रियेसाठी ठरावीक मुदतीचे बंधन नसावे.
Comments are closed.