Marathwada Rain Update: गोदाकाठ रात्रभर जागा! सायरनचे आवाज, अन् धावपळ… गावात केवळ कर्ते पुरुष शिल्लक

>> उदय जोशी, बीड
जायकवाडी जल साठ्यातून तीन लाख क्युसेस पाणी गोदावरीत सोडल्यानंतर गोदावरीला भीषण पूर परिस्थिती निर्माण झाली आहे, ताशी चार ते पाच की मी वेगाने येणारे पाणी रात्री बारा वाजता बीड जिल्ह्याच्या गोदाकाठावर धडकले आहे, महापुराच्या भीतीने रात्रभर गोदाकाठ जागा आहे, भयभीत झालेल्या नागरिकांचे रात्रभर स्थलांतर सुरू होते, पांचाळेश्वर मध्ये पाणी घुसले तर राक्षसभूवन मधील मंदिराच्या वर असणारे मारोती पाण्यात आहेत , गावागावात फक्त कर्ते पुरुष थांबले आहेत. शाळेच्या ठिकाणी स्थलांतर झाले आहे.
जायकवाडी प्रकल्पातील तीन लाख क्यूसेस पाण्याचा विसर्ग अतिवृष्टी बाधीत बीड जिल्ह्यातील गोकाठावर धडकला, शहागड च्या पुलावर मध्य रात्री मोठा फौज फाटा तैनात होता, बीड जिल्ह्यातील तब्बल 62 आणि जालना जिल्ह्यातील पन्नास गोदा काठ गावांनी रात्र जागून काढली, जस जसा पुराचा वेढा गडद होत गेला तसे भीतीचे वातावरण निर्माण झाले, लहान लेकरे आणि वृद्धांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले.
गावात क्षणाक्षणाला सायारन वाजवले जात होते, पाणी पातळी सांगितली जात होती काही भागात मध्य रात्री एन डी आर एफ चे पथके तैनात करण्यात आले होते, कुरण पिंपरी पासून ढाले गावपर्यंत प्रशासन अलर्ट मोड वर होते, सकाळी अनेक गावांना पुराने वेढले होते, गावात आता फक्त कर्ते पुरुष राहिले आहेत, शनी महाराजांचे संपूर्ण मंदिर तर पाण्यात आहे, मंदिरावर असणारे मारोती मंदिर पाण्यात आहेत, पाणी वेशीच्या आत घुसले आहे, गेवराई तालुक्यातील अनेक गावांना बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही , बहुतांश रस्ते पाण्याखाली गेले आहेत.
Comments are closed.