आयआयटी वडिलांवर मारिजुआना सापडला

जयपूरमध्ये गुन्हा दाखल : हॉटेलमधून घेतले ताब्यात

वृत्तसंस्था/ जयपूर

प्रयागराजमधील महाकुंभामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेला आयआयटी बाबा आता एका नवीन वादात अडकला आहे. जयपूरच्या शिप्रा पथ पोलीस ठाण्यात आयआयटी बाबाविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना बाबाजवळ गांजा सापडला असून त्याआधारे हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. त्याला हॉटेलमधून ताब्यात घेण्यात आले असून सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

एफआयआर नोंदवल्यानंतर आयआयटी बाबाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ पोस्ट केला असून पोलिसांवर कडक वर्तनाचा आरोप केला. या व्हिडिओमध्ये त्याने गांजाचे वर्णन भगवान शिवाचा प्रसाद असे केले आहे. त्यापूर्वी त्याने पोलिसांसमोर आत्महत्या करण्याची धमकीही दिली होती. झडतीदरम्यान गांजा सापडल्यानंतर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती शिप्रा पथचे एसएचओ राजेंद्र गोदरा यांनी दिली. रिद्धी-सिद्धी चौकाजवळील एका हॉटेलमध्ये बाबा वास्तव्यास असताना ही कारवाई करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

Comments are closed.