अमृतसरमध्ये 1.64 कोटी रुपयांचा गांजा जप्त
वृत्तसंस्था/अमृतसर
अमृतसरमध्ये शनिवारी एका मोठ्या कारवाईत तब्बल 1 कोटी 64 लाख रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला. ड्रग्ज गैरवापराच्या विरोधात सुरू असलेल्या मोहिमेत कस्टम विभागाला मिळालेले हे मोठे यश मानले जात आहे. स्पॉट प्रोफाइलिंग आणि बॅगेज क्रीनिंग दरम्यान अमृतसर कस्टम टीमने एका प्रवाशाच्या सामानातून 1 किलो 640 ग्रॅम गांजा जप्त केला. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत अंदाजे 1.64 कोटी रुपये आहे. सदर प्रवासी बँकॉकहून अमृतसरमध्ये दाखल झाला होता. त्याच्या वागण्याने संशय निर्माण झाल्यानंतर कस्टम अधिक्रायांनी त्याची कसून तपासणी केली. तपासणीमध्ये त्याच्याकडे गांजासाठा असलेले पॅकेट सापडल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून सखोल तपास केला जात आहे.
Comments are closed.