माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे मार्केटमधील फुलांपासून अगरबत्ती, सेंद्रिय खत; १० मेट्रिक टन टाकाऊ फुलांवर होणार प्रक्रिया
दादर येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे फूलबाजारात टाकाऊ फुलांपासून आता अगरबत्ती आणि सेंद्रिय खत बनवण्यात येणार आहे. यासाठी पालिका अत्याधुनिक तंत्रज्ञानाची यंत्रणा उभारणार आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता लवांगरे यांनी आज फूलबाजाराला भेट देऊन आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
दादर फूलबाजार परिसरात दररोज १० मेट्रिक टन इतक्या प्रमाणात टाकाऊ फुलांची विल्हेवाट लावण्याचे काम करण्यात येते. क्षेपणभूमीवर वाहतूक करून हा कचरा नेण्यापेक्षा नजीकच्या परिसरातच फुलांपासून सेंद्रिय खत, अगरबत्ती यांसारखी उत्पादने निर्माण करणे शक्य आहे. त्यासाठी ‘जी उत्तर’ विभागाने फुलांच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठीचा प्रकल्प हाती घ्यावा. त्यामुळे फुलांच्या कचऱ्यासोबत इतर कचऱ्याचे वर्गीकरण शक्य होईल. स्थानिक पातळीवरच कचऱ्याची विल्हेवाट लावल्याने रोजगार निर्माण होईलच, शिवाय कचऱ्याची समस्याही मार्गी लागेल.
Comments are closed.