‘जैश’चे 10 हजार फिदायीन तयार, मसूद अझहरची दर्पोक्ती

’आमच्याकडे 10,000 फिदायीन जिहादसाठी तयार आहेत. हे फिदायीन कोणत्याही प्रकारच्या मिसाइलचा सामना करू शकतात,’ अशी दर्पोक्ती जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या दहशतवादी मसूद अझहरने केली आहे. मसूद अझहर पाकिस्तानात असल्याचे सिद्ध झाल्यास त्याचे प्रत्यार्पण करण्याची आमची तयारी आहे, असे पाकिस्तानचे माजी मंत्री बिलावल भुत्तो झरदारी म्हणाले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानच्या बहावलपूरमधील मशिदीतून मसूदच्या भाषणाचा ऑडिओ व्हायरल झाला आहे.
Comments are closed.