बहावलपूर कुटुंबातील इंडियन आर्मी मसूद अझरच्या छावणीने ठार मारले
भारताने केलेल्या या हल्ल्यात मसूद अजहरचे कुटुंब ठार झाले आहे
Operation Sindoor Masood Azhar : मागील काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्यदलाने मंगळवारी रात्री उशिरा रात्री पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी ठिकाणांवर एअर स्ट्राईक केला आहे. या हल्ल्यात 80 ते 90 दहशतवादी ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारताने केलेल्या या हल्ल्यात मसूद अजहरचे कुटुंब ठार झाले आहे. भारतीय सेनेचा मुख्य हल्ला हा बहावलपूरमध्ये मसूद अजहरच्या तळावर करण्यात होता. त्यात हल्ल्यात अजहरचे कुटुंब नष्ट झाले असल्याची समजते आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताने मसूद अजहरच्या घरावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात त्याच्या जवळच्या 10 ते 14 जणांना मृत्यू झाला आहे. मसूदने एक निवेदन जारी करत ही माहिती दिली आहे. यामध्ये मसूद अजहरची बहिण, त्याचा जावई आणि भावाच्या मुलाचा समावेश आहे. तसेच रऊफ असगर देखील या हल्ल्यात गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येत आहे.
काय म्हणाला मसूद अजहर?
बहावलपूरमध्ये मसूद अजहरच्या तळावर घरावर हल्ला झाल्यानंतर अजहरची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. मीही मेलो असतो तर बर झालं असतं असं मसूद अजहरने म्हटंल आहे. कुंटुंबाची अवस्था पाहून अजहर रडला आहे.
दरम्यान, भारताने पाकिस्तान अधिकृत जम्मू-काश्मीरमधील मुजफ्फराबाद, कोटली, गुलपुर, बिंबर आणि सियालकोट, चक, अमरु, मुरीदके, बहावलपूर अशा नऊ ठिकाणी हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर देशभरातून विविध प्रतिक्रिया येत आहेत.
Comments are closed.