छत्तीसगडमधील एका कारखान्यात भीषण स्फोट, 6 ठार.

अनेक कामगार होरपळून जखमी

रायपूर : छत्तीसगडच्या बलौदाबाजारमध्ये असलेल्या एका फॅक्ट्रीत भीषण आग लागली आहे. या दुर्घटनेत कमीतकमी 6 कामगारांचा मृत्यू झाला असून 10 पेक्षा अधिक कामगार गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना भाटापारा क्षेत्रातील स्पंज आयर्न फॅक्ट्रीत झाली आहे. गुरुवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास फॅक्ट्रीत जोरदार विस्फोट झाला, ज्यानंतर अत्यंत वेगाने आग फैलावली, यामुळे अनेक कामगार याच्या तावडीत सापडले. विस्फोटाची तीव्रता अधिक असल्याने आसपास काम करणाऱ्या लोकांना बाहेर पडण्याची संधी मिळू शकली नाही. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन, पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तेथे धाव घेतली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही कामगार होरपळले गेल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.

Comments are closed.