नागपुरात स्फोटक बनवणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट
16 कामगारांचा मृत्यू
प्रतिनिधी/ नागपूर
नागपूर जिह्यातील काटोल तालुक्यातील राऊळगाव येथे रविवारी सकाळी स्फोटके बनवणाऱ्या एसबीएल या कंपनीत भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत 16 कामगारांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्फोटानंतर या कंपनीत भीषण आग लागल्याने बचावकार्यात अडथळे येत हेते. सकाळी कंपनी सुरु होताच सकाळी 7 वाजताच हा भीषण स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. बारुद आणि त्यापासून डेटोनेटरसह इतर स्फोटक बनवणाऱ्या कंपनीत हा मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.
सकाळी काम सुरु होताच अचानक स्फोट
प्राथमिक माहितीनुसार, सकाळी 6 ते 7 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. राऊळगाव येथील ‘एसबीएल’ कंपनीत खाणकामासाठी लागणारे डिटोनेटर व इतर स्फोटके तयार केली जातात. कामगार नेहमीप्रमाणे कामावर रुजू झाले असताना डिटोनेटर निर्मिती प्रक्रियेदरम्यान अचानक मोठा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज परिसरात दूरवर आल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली. स्फोटाची तीव्रता इतकी होती की संबंधित युनिटचा काही भाग कोसळल्याचीही माहिती मिळत आहे. धुराचे प्रचंड लोट उठले हेते.
स्फोटनंतर परिसरात आग, नागरिकांमध्ये मोठा रोष
या भीषण स्फोटानंतर परिसरात मोठा आवाज होऊन एकच खळबळ उडाली. या भीषण स्फोटात जखमी कामगारांना जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या स्फोटनंतर परिसरात आगही लागली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्नीशामक विभागाकडून युद्धपातळीवर बचावकार्य राबविण्यात आले. दरम्यान परिसरात मृतकांच्या नातेवाईकांनी परिसरात गर्दी केली होती. या घटनेनंतर नागरिकांमध्ये मोठा रोष उसळला होता.
कंपनीकडून सुरक्षिततेबद्दल दुर्लक्ष : आमदार चरणसिंग ठाकूर
या स्फोटाच्या अपघातावर काटोलचे आमदार चरणसिंग ठाकूर यांनी 15 मृत्यू आणि 20 जखमी झाले असल्याचे सांगितले आहे. या ठिकाणी कंपनीकडून सुरक्षिततेबद्दल मोठं दुर्लक्ष असल्याचा आरोप त्यांनी केला. प्रशिक्षणाशिवाय आणि कुठलीही आवश्यक ती काळजी न घेता कामगार वापरले जातात, असा त्यांचा आरोप आहे.
वर्षभरापूर्वीच्या स्फोटाची आठवण
राऊळगाव शिवारातील कोतवालब•ाr शिवारातील एशियन फायर वर्क्स या एक्सप्लोसिव्ह कंपनीमध्येही वर्षभरापूर्वी (दि. 16 फेब्रुवारी 2025) एशियन फायर वर्क या कंपनीमध्ये मोठा स्फोट झाला होता. फटाक्यांची वात तयार करताना ही घटना घडली होती. स्फोटावेळेला कंपनीत मोठ्या संख्येने कामगार काम करत होते. मात्र, ज्या विशिष्ट प्लांटमध्ये हा स्फोट झाला, त्या ठिकाणी चार कामगार कार्यरत होते. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला होता, तर इतर दोघे जखमी झाले होते.
वारसांना पाच लाखांची मदत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर जिह्यातील राऊळगाव येथे स्फोटकांच्या एका फॅक्टरीत झालेल्या स्फोटाची घटना अतिशय दुर्दैवी आणि दु:खद असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुर्घटनेत मफत्यू झालेल्यांच्या वारसांना पाच लाख ऊपये आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले आहे.याशिवाय संबंधित कंपनी देखील मफतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देणार आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
स्फोटके कंपनीच्या सेफटी ऑडिटकडे दुर्लक्षाने घटनेमध्ये वाढ : अनिल देशमुख
बाजारगाव परिसरात असलेल्या सर्वच स्फोटके तयार करणाऱ्या कंपनीमध्ये वारंवार होत असलेले स्फोटामुळे कामगारांचा मफत्यू होत आहे. ही गंभीर बाब असून या परीसरातील सर्वच स्फोटके कंपनीचे सेफटी ऑडीट करण्यासाठी माजी गफहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री यांच्यासह पेंद्रीय मंत्री,पेट्रोलियम आणि स्फोटके सुरक्षा संघटना व संबधीत विभागाकडे पत्र लिहुन केली होती. परंतु याकडे पुर्णपणे दुर्लक्ष केल्याने परत आज एक मोठी दुघटना घडली. वेळीच जर सेफटी ऑडिट केले असते तर आजची घटना टाळता आली असती असे मत अनिल देशमुख यांनी व्यक्त केले.
जखमींची विचारपुस
अनिल देशमुख यांनी घटना स्थळी जावून पाहणी केली. तसेच कंपनी मालक यांच्यासोबत फोनवऊन चर्चाकऊन मफतकांच्या नातेवाईकांना 50 लाख ऊपयाची मदत करावी तसेच जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च करावा अशी मागणी केली. तसेच त्यांनी ऊग्णालयात जावून जखमींची विचारापूस करीत डॉक्टरांकडुन त्यांच्या प्रकृतीची माहिती जानून घेतली. तसेच मफतकांच्या कुटुंबीयांची भेट घेवून त्यांचे सात्वन करीत धिर दिला.
Comments are closed.