ओडिशातील NTPC प्रकल्पात भीषण स्फोट
भुवनेश्वर: ओडिशाच्या अंगुल जिह्यातील एनटीपीसीच्या औष्णिक वीज प्रकल्पात शनिवारी पहाटेच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत पाच कामगार जखमी झाले असून, त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमी कामगारांपैकी तिघांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर दोघांना भुवनेश्वरला हलवण्यात आले आहे. युनिट 1 मधील कोळसा साठवणूक सुविधेत स्फोट झाल्याची माहिती देण्यात आली. हा स्फोट नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. या दुर्घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी तंत्रज्ञांकडून सखोल तपासणी सुरू करण्यात आली आहे.
Comments are closed.