पालघरमध्ये गादी कंपनीला भीषण आग, दोन कामगार गंभीर जखमी

पालघर येथली वाडा तालुक्यातील कोना ग्रामपंतायतीजवळ एमआयडीसीतील गादी कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत दोन कामगार होरपळले असून त्यांची अवस्था गंभीर आहे. या आगीत 23 कोटींचे नुकसान झाले आहे.

बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास ही आग लागली. आगीने काही वेळातच रौद्र रुप घेतले. कारखान्यात गादी बनवण्यासाठी लागणारा फोम असल्याने मोठा भडका उडाला आहे. यामध्ये काही कामगार गंभीर जखमी झाले आहेत.  अजय रावत (35), राणी रावत (32) अशी जखमींची नावे आहेत. वाड्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार प्रारंभ आहे.

कोन येथे भगवान फुलांचे इंडस्ट्रीयल प्रा. लि. या कंपनीत फोमचे उत्पादन केले जाते. सकाळी साडेनऊच्या सुमारास अजय नावाचा कामगार बॉयलरजवळ काम करत असताना अचानक बॉयलरचा स्फोट झााला आणि आग पसरली. बॉयलरजवळ त्या कामगाराची पत्नी राणीही होती. यात दोघेही गंभीर जखमी झाले आहे. त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे, या आगीत 23 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे कंपनीचे मालक भरत जैन यांनी दिली आहे.

Comments are closed.